सुशांतनंतर आता मोहित रैनाचा जाऊ शकतो बळी; सेव्ह मोहित मोहिमेनंतर अभिनेत्याची ४जणांविरुद्ध तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘देवो के देव महादेव’ मालिकेतील महादेवाची भूमिका साकारणारा अभिनेता मोहित रैना याने चार जणांविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ‘महादेव’, चित्रपट ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ आणि वेब सिरीज ‘भौकाल’ व ‘काफिर’ या मधून मनोरंजन क्षेत्रात प्रसिद्ध असलेला अभिनेता मोहित रैनाबाबत काही दिवसांपूर्वी त्याचा सुशांत प्रमाणे मृत्यू होऊ शकतो असा धक्कादायक दावा करण्यात आला होता. यानंतर सेव्ह मोहित अशी मोहीम जोरावर होती.

अभिनेता मोहित रैनाची तथाकथित स्वयंघोषित शुभचिंतक सारा शर्माने सोशल मीडियावर ‘सेव्ह मोहित’ ही मोहीम चालवली होती. तिच्या म्हणण्यानुसार, मोहित रैनाच्या जिवाला धोका आहे. सुशांत सिंह राजपूतप्रमाणे मोहित रैनाचाही मृत्यू होऊ शकतो, असे तिने म्हटले होते. मात्र, कालांतराने मोहितच्या घरातले आणि स्वत: मोहितने माध्यमांसमोर येऊन मी अगदी फिट आणि फाईन आहे असे सांगितले होते.

https://www.instagram.com/p/COww9IYrb6U/?utm_source=ig_web_copy_link

मात्र या घटनेनंतर मोहितने न्यायालयात धाव घेतली होती, असे समोर येत आहे. त्यानुसार, बोरिवली न्यायालयाने संबधित पोलिसांना मोहितचा जबाब नोंदवून घेऊन त्वरित तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांचे पालन करीत गोरेगाव पोलिसांनी मोहितचा जबाब नोंदवून सारा शर्मा आणि तिच्या सोबत परवीन शर्मा, आशिव शर्मा, मिथीलेश तिवारी यांच्यावर मोहितला त्रास दिल्याबद्दल गुन्हा नोंद केला आहे. मोहितने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या चौघांवर गुन्हेगारी कट रचणे व पोलिसांना चुकीची माहिती देणे, धमकी देणे आणि खंडणी मागण्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment