सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
अभिनेता किरण माने यांना मूलगी झाली हाे मालिकेतून काढल्यानंतर वाई तालुक्यातील गुळुंब या गावात सुरू असलेले शूटिंग बंद करा अशा आशयाचे सरपंचाच्या सहीचे पत्र व्हायरल झाले. दरम्यान सध्या गावामध्ये शूटिंग सुरू आहे. या बद्दल सरपंच स्वाती माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अभिनेते किरण माने यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून नुकतंच काढण्यात आले आहे. माने यांनी समाज माध्यमातून राजकीय पाेस्ट केल्याने त्यांना काढल्याची चर्चा आहे. दरम्यान माने यांच्या कारवाई झाल्यानंतर त्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनतेसह राजकीय मंडळी ठामपणे उभी राहिली आहे.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतेच अभिनेते माने यांनी तक्रार दिल्यास राज्य शासन याेग्य ती कारवाई करेल असे आश्वासन दिले आहे. दरम्यान मूलगी झाली हाे या मालिकेचे शुटींग तातडीने बंद करा असे पत्र वाई तालुक्यातील गुळुंबचे सरपंच स्वामी माने यांच्या सहीचे समाज माध्यमातून व्हायरल झालं आहे. मात्र, तरीही आज गुळूंब येथे मालिकेचे शूटींग सुरू असल्याचे दिसून आले.
या गावात सुरू असलेले शूटिंग बंद करा असा आशय पत्रात नमूद आहे. दरम्यान गावामध्ये सध्या मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. याबद्दल सरपंच स्वाती माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.