वर्ल्ड कप 2007 मध्ये झालेल्या पराभवानंतर राहुल द्रविडने धोनी-पठाणला दाखवला चित्रपट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज राहुल द्रविड (Rahul Dravid) मैदानावर आणि मैदानाबाहेर शांत स्वभावासाठी ओळखला जातो. श्रीलंका दौर्‍यावर द्रविडला भारतीय संघाचा (India vs Sri Lanka) प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे. श्रीलंकेविरुद्ध भारताला तीन एकदिवसीय मालिका आणि 3 टी -20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. द्रविडला आता गेल्या पाच वर्षांत टीम इंडियाकडून खेळणार्‍या अनेक युवा खेळाडूंच्या कारकीर्दीचे श्रेय दिले जाते. द्रविडबरोबर खेळलेले व्हीव्हीएस लक्ष्मण आणि इरफान पठाण यांनी त्याच्या शांत स्वभावाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 2007 मधील विश्वकरंडकातील पराभवानंतर द्रविडने त्यांना आणि एमएस धोनी यांना चित्रपट दाखविला होता, असा खुलासा भारताचा माजी वेगवान गोलंदाज पठाणने केला आहे.

इरफान पठाणने सांगितले की,”द्रविड तरूणांना मार्गदर्शन करतो आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो. ज्याप्रकारे द्रविड युवा खेळाडूंशी बोलतो, त्यावरून खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो.” तो म्हणाला की, “2007 च्या वेस्ट इंडिजमधील विश्वचषकातील मला एक लहान किस्सा आठवतो आहे. द्रविड माझ्याकडे आणि धोनीकडे आला आणि म्हणाला की, प्रत्येकजण दु: खी आहे, आपण चित्रपट पाहण्यासाठी जायला हवे.” 2007 चा विश्वकरंडक हारल्यानंतर द्रविडने कर्णधार म्हणून सर्व खेळाडूंना सांगितले की,”हा पराभव म्हणजे अंत नाही आणि यापेक्षा आयुष्य खूप मोठे आहे. आपण कमबॅक करू.”

लक्ष्मणनेही केले द्रविडचे कौतुक
राहुल द्रविडबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये अनेक महत्त्वपूर्ण भागीदारी केलेल्या लक्ष्मणचा असा विश्वास आहे की,”भविष्यातील चांगला संघ निर्माण करण्याची संधी आपल्याकडे आहे.” लक्ष्मण म्हणाला कि, “मला वाटत नाही की, द्रविडवर कोणताही दबाव असेल. त्याला खेळाडूंना भविष्यातील चॅम्पियन बनवण्याची संधी आहे. प्रत्येकाला खेळण्याची संधी मिळण्याची गरज नाही पण राहुल द्रविडबरोबर फक्त वेळ घालवणे आवश्यक आहे. तो योग्यप्रकारे मदत करेल. त्याचा त्यांना चांगला फायदा होईल.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment