पुणे प्रतिनिधी | दोन दिवसापासून मूकबधिर तरुण आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी पुण्यात समाजकल्याण आयुक्तालयासमोर आंदोलनाला बसले होते.यावेळी आंदोलक तरुणांवर पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होत होता.
शासनाच्या वतीने सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आंदोलकांशी संवाद साधला. त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या’ राज्य सरकारने सभागृहात काही मागण्या मान्य केल्याचं लेखी आश्वासन दिल आहे.तसेच उर्वरित मागण्या मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन पूर्ण करणार असल्याचं आश्वासन दिले आहे.अखेर या आंदोलनातील तरुणांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
दिलीप कांबळे यांनी आंदोलकांना मागण्या मान्य झाल्याचं निवेदन वाचून दाखवले.या मागण्या मान्य झाल्यामुळे आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले आहे.आता आंदोलक आपापल्या घरी जाणार आहेत. मात्र उर्वरित मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचं इशारा दिला आहे.
इतर महत्वाचे –
तब्बल १९ वर्षानंतर संजय लीला भंसाली यांच्या चित्रपटात सलमान खान
जैश-ए-मोहम्मदला भारताचे चोख प्रत्युत्तर
आमच्या सभ्यतेला आमची कमजोरी समजू नका – सचिन तेंडुलकरचा पाकिस्तानवर हल्लाबोल