औरंगाबाद | चोरट्यांनी शिक्षकेचे घर फोडून चांदीचे दागिने 30 ते 35 हजार रुपये लांबावल्याची घटना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास सेव्हन हिल परिसरात घडली आहे. रजनी मुकुंद वाटवे (50 रा. मोगरा अपार्टमेंट राणा नगर )असे शिक्षकाचे नाव आहे त्या बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्याने अपार्टमेंटमध्ये शिरुन चोरी केली.
रजनी वाटवे या कुटुंबियासह 3 जुलै रोजी पुण्याला गेले होत्या. त्यानंतर बुधवारी सकाळी त्या घरी पोहोचल्या त्यावेळी गॅलरीच्या दरवाजातून आत शिरलेल्या चोराने प्रत्येकी एक किलोची चांदीची दोन ताटे, वाट्या, पूजेचे साहित्य, कुंकवाचा करंडा, लहान मुलाच्या वाळा, आणि तीस ते पस्तीस हजाराची रोकड असा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पुंडलिक नगर पोलिसांना माहिती दिली.
यानंतर सपोनि घनश्याम सोनवणे यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी राणा नगरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तपासणी सुरू केली आहे. या प्रकरणी वाटवे यांच्या तक्रारीवरून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.