संचारबंदीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी नागरिकांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या हे चिंतेचे कारण बनली आहे. त्याबरोबर राज्यातील अफवाचे पीक देखील एक गंभीर विषय बनला आहे. मध्यंतरी एकदा मुख्यमंत्री गरज पडली तर पुन्हा संचारबंदी जाहीर करावी लागेल असे म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचा विपर्यास करीत काहींनी पुन्हा संचारबंदीच्या अफवा पसरवल्या आहेत.  याबद्दल खुलासा करत अद्याप पुन्हा संचारबंदी जाहीर केलेली नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटर अकॉउंटवरून सांगितले आहे. तसेच कुठेही गर्दी न करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

गेले दोन-अडीच महिने संचारबंदीनंतर राज्यात आता मिशन बिगिन अगेन द्वारे संचारबंदीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. हळूहळू राज्यातील कामकाज सुरु करण्यात आले आहे. ३० जूनपर्यंत पाचव्या टप्प्यातील संचारबंदी राहणार असली तर राज्यातील व्यवहार सुरु झाले आहेत. नागरिकांना घराबाहेर पडून काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र सामाजिक अलगाव चे नियम बंधनकारक आहेत. नागरिकांना मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. या अफवेनंतर मुख्यामंत्री कार्यालयातून कुठेही गर्दी करू नका, आणि शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा असे आवाहनही करण्यात आले आहे.

 

आपला करोनाविरुद्धचा लढा अद्याप संपलेला नाही, तो सुरूच असून सतर्क राहून घाई-गडबड आणि गर्दी न करता आपल्याला सार्वजनिक ठिकाणी वावरावे लागेल. सार्वजनिक सेवा अद्यापही सुरु केलेल्या नाहीत. सरकार एकूण परिस्थितीचा अंदाज घेत आहे. पण जर ही उघडीप जीवघेणी ठरते आहे असं लक्षात आलं तर नाइलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाउन करावा लागेल असे मुख्यमंत्री म्हणाले होते. “आपल्याला खूप सावध राहून पुढे जगावं लागणार आहे. सरकार अतिशय सावधगिरीने पावलं टाकत आहे. कुठेही घाई, गर्दी होऊ नये. ज्याप्रमाणे लॉकडाउन आपण टप्प्याटप्प्याने लागू केला त्याचप्रमाणे शिथीलता आणत आहोत. अजूनही संकट टळलेलं नाही. अजूनही लढा संपलेला नाही. करोनासोबत लढत असताना अर्थचक्र बंद करुन चालणार नाही,” असेही ते म्हणाले होते. याचा गैरफायदा काहींनी घेतल्याचे दिसून येते आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment