माझा बाप जगणार कसा? सर्वसामान्यांनी जायचं कुठं? पुण्यातील तरुणीने मांडली हृदय पिळवटून टाकणारी व्यथा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्नांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काहींना बेड मिळत नाही तर काहीजण कोरोनावर उपचार म्हणून दिल्या जाणाऱ्या रेमडिसिव्हीर या औषधच्या तीन तीन दिवस प्रतीक्षेत आहेत. अखेर रेमडिसिव्हीर औषध उपलब्ध होत नसल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले आहे. त्यामुळे या ठिकाणी एकच गोंधळ उडाला आहे.

माझा बाप जगणार कसा? सर्वसामान्यांनी जायचं कुठं? पुण्यातील तरुणीने मांडली हृदय पिळवटून टाकणारी व्यथा

”माझे वडील 3 दिवसांपासून ससून च्या काळेवाडी येथील रुग्नालयात भरती आहेत. सुरुवातीला बेड मिळत नव्हता आता रेमडिसिव्हीर या औषधासाठी मी तीन दिवस रांगेत उभी आहे. मात्र अजून पर्यंत औषध मिळाले नाही. म्हणून आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वकाराला आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे ते जादा दराने पैसे घेऊन औषध खरेदी करतात मात्र सर्वसामान्य माणसांनी कसं करायचं? आणि माझा बाप जगणार कसा? असा मन पिळवटून टाकणारा सवाल येथील एका आंदोलनकर्त्या लेकीनं केलाय…”

त्यामुळे रेमदेसिव्हीरच्या काळ्या बाजारावर प्रशासन कधी नियंत्रण ठेवणार आणि सर्वसामान्य माणसाला रेमडिसिव्हीर कधी उपलब्ध होणार? असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे.

दरम्यान आंदोलनस्थळी रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याने सामान्यांना हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याचा आरोप या नातेवाईकांनी केला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. करोना रुग्णांच्या नातेवाईकांनी पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालय याबाबतही हीच समस्या मांडली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे ते गेले तीन दिवस असून रिमडीसीव्हीर औषध उपलब्ध नाही.

दरम्यान राज्यात संचारबंदी असताना देखील रिमडीसिव्हिरचा तुटवडा असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संतप्त नातेवाईकांनी आंदोलन करून रिमडीसिव्हिर च्या काळ्या बाजाराकडे लक्ष वेधले आहे. यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment