मिलिट्री भरतीत वयोमर्यादेचा अध्यादेश काढावा अन्यथा खळखट्याक आंदोलनाचा काॅम्रेड्स अर्गनायझेशनचा इशारा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

उपमुख्यमंत्री यांनी डिंसेबरमध्ये भरतीची घोषणा केली. परंतु दोन वर्षात भरती न झाल्याने वयाची मर्यादा हा विषय आहे, या पार्श्वभूमीवर मिलिट्रीच्या विभागाने वयाच्या बाबतीत लेखी आश्वासन दिले आहे, मात्र त्याबाबत आदेश काढावा अन्यथा दिनांक 11 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय महामार्गावर रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कॉम्रेड्स सोशल अर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉग्रेड जयवंतराव आवळे दिला आहे.

कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या दोन वर्षात 2020 आणि 2021 मध्ये मिलिट्रीची भरती झालेली नाही. त्यामुळे मुलांच्या वयाची मर्यादा अोलांडली गेल्याने आता भरतीसाठी अपात्र ठरण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सचिव कॉम्रेड प्रा.पै. अमोल साठे, सातारा जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड बासित चौधरी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

वयोमर्यादा वाढीबाबत सूचना सरकारने लवकरात लवकर येणारी भरती प्रक्रिया सुरु होणेपूर्वी अध्यादेश काढून जाहीर करावी आणि समस्त सैन्य दल भरती इच्छुक उमेदवार आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने वयोमर्यादेचे हेच नियम कायमस्वरूपी ठेवण्यात यावे, अशी विनंती कॉम्रेड सोशल ऑर्गनायझेशनतर्फे करण्यात आली होती. दिनांक 29 सप्टेंबर 2021 चे आंदोलन शांततेत केले गेले होते. पण हे आंदोलन खळखट्याक स्वरूपाचे केले जाईल. शासन आणि प्रशासनाने याची नोंद घ्यावी, असं कॉम्रेड ऑर्गनायझेशनच्या पदधिका-यानी सांगितले.

You might also like