18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार; जो बायडन यांची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. १९ एप्रिलपासून सर्व सज्ञान व्यक्तींना कोरोना लस देण्याचे बायडन यांनी जाहीर केले आहे.

अमेरिकेतही कोरोनाचे प्रमाण अधिक आहे. तसेच लसीकरणावरही भर दिला जात आहे. मात्र, आता १९ एप्रिल २०२१ पासून १८ वर्ष आणि त्यावरील सर्व व्यक्ती कोरोना लसीकरणासाठी पात्र असतील, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केली आहे. अमेरिकेतील बहुतांश नागरिकांना १ मे २०२१ पर्यंत कोरोना लस देण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.

गेल्या ७५ दिवसांमध्ये अमेरिकेत १.५ कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली असून, आगामी काही दिवसात २ कोटी नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यापैकी ७५ टक्के ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात आली असून, हा लसीचा पहिला डोस असल्याचे सांगितले जात आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like