कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा औरंगाबादच्या वतीने आज विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर शासकीय कर्मचारी उपस्थित होते. मागासवर्गीयांना पदोन्नती आरक्षण मिळाले पाहिजे, मागासवर्गीय अनुशेष रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी यासारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

शासन वारंवार निर्णय बदलून मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांचे मानसिक व आर्थिक खच्चीकरण तसेच भारतीय राज्यघटनेतील कलम उपपद 16 नुसार मिळालेल्या हक्कावर गदा आणून त्यांच्या न्याय्य हक्कांची पायमल्ली करीत असल्याचा आरोप कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य औरंगाबादच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी घोषणाबाजी केली. या आंदोलनास कास्ट्राईब कर्मचारी महासंघचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच आर.एम. कांबळे राज्य सरचिटणीस भूमि अभिलेख, मनीज कांबळे विभागीय प्रमुख, राहुल राऊत जिल्हाध्यक्ष भूमि अभिलेख, जिल्हाध्यक्ष डॉ.बा.अं.म.वि., अरुण सोनवणे
जिल्हाध्यक्ष शिक्षक संघटना, मकरंद पाखरे जिल्हाउपाध्यक्ष जिल्हा परिषद, राज्य उपाध्यक्ष फेडरेशन, वाल्मीक सरवदे राज्य कार्याध्यक्ष शिक्षक संघटना, वाल्मीक पायतिलक जिल्हा अध्यक्ष महासंघ, एन. के. सर्जी विभागीय उपाध्यक्ष फेडरेशन, संतोष म्हस्के विभागीय सचिव भूमि अभिलेख, संदीप कांबळे जिल्हा अध्यक्ष जिल्हापरिषद, जिल्हा अध्यक्ष जलसंपदा विभाग, बी. जी. म्हस्के जिल्हा अध्यक्ष म.जि.प्रा.,विभागीय प्रमुख, अविनाश शिंगाणे विभागीय अध्यक्ष भूमि अभिलेख, आनंद ढेपे विभागीय सचीव महासंघ, राजु गंगावणे जिल्हा अध्यक्ष शा.वे. म. रुग्णालय, आशोक मगरे, विभागीय अध्यक्ष श्री.ए.बी. मोठा, सुनील बनून, शाखा प्रमुख श्री.ए.बी. मोठा, विजय सातदिवे जिल्हा अध्यक्ष आय.टी. आय., एस. एम. अंभोरे जिल्हा अध्यक्ष ग्रामसेवक संघटना, पी.एम. म्हस्के विभागीय अध्यक्ष जिल्हा परिषद, तेजस्वीनी तुपसागर विभागीय उपाध्यक्ष आरोग्य विभाग, दिलीप वानखेडे, विभागीय उपाध्यक्ष आय.टी.आय., सुशीलकुमार बनकर जिल्हा अध्यक्ष शा.दं.वै.म. रुग्णालय, जिल्हा अध्यक्ष वन विभाग, मनोज बोरुडे जिल्हा अध्यक्ष राज्य पुरातत्व विभाग आदी कर्मचारी उपस्थित होते

Leave a Comment