Agniveer Recruitment 2024 | जे विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी एक अतिशय भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे आता उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. कारण एका विशेष भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. ती म्हणजे आता भारतीय नौदलात अग्नीवीर (Agniveer Recruitment 2024) बनण्याची एक मोठी संधी तुमच्याकडे आलेली आहे. या भरती अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 4 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. आता या भरतीबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पदभरती | Agniveer Recruitment 2024
ही भरती प्रक्रिया भारतीय नौदलाकडून अग्नीवीर पदासाठी राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे भरली जाणार आहेत. त्याचप्रमाणे पुरुष आणि महिला या पदासाठी अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीचे अर्ज करण्यास थोडेच दिवस राहिलेले आहे. 4 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा.
शैक्षणिक पात्रता
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे बारावीमधून गणित आणि फिजिक्स या विषयात झाले असेल तर त्या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे केनीकल, इलेक्ट्रिकल आणि ऑटोमोबाईल या तीन विषयांचा डिप्लोमा असलेल्या विद्यार्थ्यांना देखील अर्ज करता येणार आहे.
अर्ज फी
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 500 रुपये एवढी फी असणार आहे.
भरती प्रक्रिया | Agniveer Recruitment 2024
या भरती अंतर्गत उमेदवारांना सगळ्यात आधी लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर उमेदवारांची फिजिकल टेस्ट आणि मेडिकल टेस्ट होईल. त्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. आणि नंतरच उमेदवारांची निवड करण्यात येईल.