सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने केलं ‘हे’ आवाहन

Satara Kharif season News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात एक हंगाम झाला कि दुसऱ्या हंगामाची तयारी शेतकऱ्याकडून केली जाते. मात्र, वातावरण बदलामुळे त्याला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यास नुकसान भरपाई दिली जाते. याबरोबरच जिल्ह्यात येणाऱ्या खरीप हंगामासाठी विविध पीकपद्धती पाहता कृषी विभागाकडून नियोजन केले जात आहेत. जिल्हा कृषी विभागाकडून करीत हंगामाच्या दृष्टीने आवश्यक रासायनिक खते व बियाण्यांचा मुबलक साठा उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच खतांच्या काळाबाजार रोखण्यासाठीही 12 भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.

सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने खरीप आणि रब्बी असे दोन एक हंगाम घेण्यात येतात. यामध्ये खरीप हंगाम हा सर्वात मोठा असतो. या पिक हंगामासाठी खते आणि बियाण्याची आवश्यकता शेतकऱ्यांना सर्वात जास्त लागते. त्यासाठी कृषी विभागाकडून हंगामापूर्वी दोन-तीन महिने अगोदर नियोजन केले जाते. त्यामुळे पेरणीच्यावेळी शेतकऱ्यांना फारशी अडचण येत नाही. यंदाही कृषी विभागाने जिल्ह्यातील खरीप हंगामाचे नियोजन केलेले आहे.

खरीप हंगामात बी-बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ होते. बियाणे खरेदीस इतर शासकीय योजनाही त्यांच्या हितासाठी असतात. त्याबाबत माहिती मिळत नसेल तर चिंता करू नका Hello Krushi हे मोबाईल अँप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा आणि शासकीय अनुदानाच्या योजनांविषयी माहिती घेऊ शकतात. शिवाय तुमच्या जवळच्या कृषी केंद्रांशीही संपर्क साधू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे अँप Download करून Install करा. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या खत दुकानदार, रोपवाटिका आणि कृषी केंद्रे यांची यादी दिसेल. याव्यतिरिक्त Hello Krushi मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, बाजारभाव, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही मिळतील. त्यासाठी हॅलो कृषी डाउनलोड करा.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

सातारा जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र 3 लाख 97 हजार 348 हेक्टर आहे. त्यासाठी 47 हजार 339 क्विंटल बियाणे मागणी नोंदविण्यात आलेली आहे. तर 1 लाख 36 हजार 500 मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी कृषी आयुक्तालय यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यानंतर कृषी आयुक्तालयकडून जिल्ह्यासाठी 1 लाख 15 हजार 101 मेट्रिक टन रासायनिक खत आणि 54 हजार 770 नॅनो युरिया बॉटलचे आवंटन खरीप हंगामासाठी मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये युरिया 42 हजार 521 मेट्रिक टन, डीएपी 12 हजार 131 मेट्रिक टन, एमओपी 6 हजार 761 मेट्रिक टन, सुपर फॉस्फेट 11 हजार 939 मेट्रिक टन तर इतर संयुक्त खते 39 हजार 19 मेट्रिक टन खतांचा समावेश आहे.

सध्याच्या परिस्थितीत सातारा जिल्ह्यात 63 हजार 561 मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. यामध्ये मागील हंगामातील 55 हजार 862 मेट्रिक टन खत शिल्लक आहे. तर आता 1 एप्रिलपासून 7 हजार 699 मेट्रिक टन खत पुरवठा करण्यात आलेला आहे. उपलब्ध खतामध्ये युरिया 18 हजार 943 मेट्रिक टन, डीएपी 9 हजार ११९ मेट्रिक टन, एमओपी 834 मेट्रिक टन, सुपर फॉस्फेट 9 हजार 798 मेट्रिक टन, इतर संयुक्त खते 24 हजार 867 मेट्रिक टनचा समावेश आहे.