Agriculture Infrastructure Fund Scheme | सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणार तब्बल 2 कोटी रुपयांचे कर्ज; जाणून घ्या नवी योजना

Government Scheme
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agriculture Infrastructure Fund Scheme | आपल्या देशाची 50 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. म्हणजेच आपल्या देशातील अन्नदाता शेतकरी नेहमीच महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपली सरकार देखील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असतात. जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल आणि चांगले पीक घेता येईल. शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी. यासाठी सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे कृषी पायाभूत सुविधा (Agriculture Infrastructure Fund Scheme) निधी. सरकारने ही योजना शेतकऱ्यांच्या पायाभूत विकासासाठी राबविण्यात आलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कृषी क्षेत्रात चांगल्या प्रकारे प्रगती करण्यात यावी. शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, जसे की रस्ते, पुल सिंचन यांसारख्या सुविधा देण्यासाठी सरकार नेहमीच कार्यरत असते.

भारतातील सर्व सरकारी आणि खाजगी कृषी क्षेत्राच्या विकासात मदत करण्यासाठी सरकारने ही खास योजना राबवलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तांत्रिक ज्ञान मिळते. शेती आधुनिक पद्धतीने कसे करायचे? या गोष्टीची देखील माहिती मिळते. तसेच शेतीसाठी लागणाऱ्या अनेक सुविधांची पूर्तता देखील सरकारकडून होत असते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेज, प्रोसेसिंग युनिट, गोदाम, पॅकेजिंग, युनिट या सगळ्या गोष्टी उभारण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जाते. केंद्र सरकार हे शेतकऱ्यांना या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी जवळपास दोन कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देत असते. सात वर्षासाठी हे दोन कोटी रुपयांचे कर्ज दिले जाते. हे कर्ज किंवा 3 टक्के व्याजदरावर दिले जाते.

कृषी पायाभूत सुविधा निधीचे फायदे | Agriculture Infrastructure Fund Scheme

  • कृषी क्षेत्राच्या विकासासाठी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन सुविधा गोदाम तयार करण्यासाठी कर्ज दिले जाते.
  • त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना तांत्रिक सहाय्य आर्थिक मदत आणि इतर सेवा देखील सरकारच्या माध्यमातून दिल्या जातात.
  • अर्थव्यवस्थेसाठी कृषी हा एक प्रमुख स्त्रोत आहे.
  • त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून शेती व्यवसाय त्यांची प्रगती केली जावी. या उद्देशाने त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.