कराड | देशात पूर्ण वेळ शेतकरी व अर्धवेळ शेतकरी अशी वर्गवारी करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेती विषयक विविध योजना पूर्णवेळ शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवणे शक्य होऊ शकेल. भूकबळी, कुपोषण, बेरोजगारी, प्रदूषण या सर्व समस्यांवर प्रभावी शेती हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे शेती क्षेत्रावर लक्ष केंद्रित केल्यास अशा विविध समस्या संपुष्टात येऊ शकतील. राज्याला प्रगतीपथावर नेण्याच्या दृष्टीने कृषी व सिंचन हे फार महत्वाचे विषय असल्याचे जेष्ठ कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक असे ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री लोकनेते स्वर्गीय विलासराव पाटील- उंडाळकर (काका) यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त प्रतिमापूजन व अभिवादन सभा पुणे येथे संपन्न झाली. रयत संघटना पुणे यांच्या वतीने कोयना सहकारी बँक लिमिटेड शाखा – आकुर्डी (पुणे) येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे जेष्ठ कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक बोलत होते. यावेळी कामगार नेते यशवंत भोसले, जेष्ठ इतिहास संशोधक प्रा. सुहास नाईक, राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी अशोक मोरे, उद्योजक तात्यासाहेब शेवाळे उपस्थित होते.
डॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले, स्व. विलासकाकांनी 50 ते 55 वर्षे राजकारण, समाजकारण करताना काही तत्वे जोपासली ती शेवटपर्यंत त्यांनी पाळली. काँग्रेस विचारधारेचा प्रभाव त्यांच्यावर शेवटपर्यंत कायम होता. तो प्रभाव त्यांनी कृतीतूनही सिद्ध केला. सहकार, राजकारण, समाजकारणात आदर्श निर्माण करताना त्यांनी वैचारिक अधिष्ठान वाढवण्यासाठी केलेले काम राज्यात आदर्शवत असे आहे. आदर्श व वास्तव विचार पुढे घेऊन जाणाऱ्या मोजक्या मंडळीत त्यांचे स्थान अढळ होते. स्व. विलासकाका प्रेमळ व निष्कलंक राजकारणी होते. त्यांच्या जाण्याने राजकारण, समाजकारण चळवळीचेच नव्हे तर कृतिशील समाजरचना निर्मिती कार्य करणाऱ्या चळवळीची ही मोठी हानी झाली आहे.
या कार्यक्रमास नाना पिसाळ, प्रमोद थोरात, प्रवीण पाटील, विश्वजीत कांबळे, विक्रमसिंह नलवडे, जयदीप लाड, एकनाथ मोहिते- काजारी, प्रज्योत चव्हाण, प्रितम पडवळ, संतोष पाटील, किशोर हिरवे, प्रितम चव्हाण, नितीन थोरात, वैभव शेवाळे, राजवर्धन पिसाळ, सुरज चव्हाण, अविनाश जाधव, बाळासाहेब शेवाळे, सत्यम पाटील, शंभूराज चव्हाण, संदेश थोरात, संतोष चव्हाण, शैलेश मुळगांवकर, गणेश थोरात, अमर जाधव, मनोज शेवाळे, कृष्णा मोहिते, अभिजीत लोहार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद थोरात व सूत्रसंचलन विक्रमसिंह नलवडे- पार्लेकर यांनी केले. सुभाष चव्हाण यांनी आभार मानले.