कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात; केंद्र सरकारचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वादग्रस्त ठरलेले कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घेऊन महिना उलटत नाही तोच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी पुन्हा एकदा कृषी कायदे येऊ शकतात अस म्हंटल आहे. नरेंद्र सिंग तोमर नागपूर दौऱ्यावर असून ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

गावपातळीवरील शेतकरी व एकूणच शेती क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने कायदे आणले होते, परंतु काही लोकांना ते पटले नाही, असे म्हणत कृषी कायदे रद्द होण्यासाठी काही लोक जबाबदार असल्याचं नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटलं.

केंद्र सरकारला नाईलाजाने तीन पाऊल मागे यावे लागले. पण सरकार निराश नाही. शेतकरी आपल्या भारताचा कणा आहेत. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी एक पाऊल पुढे येऊ असे म्हणत, भविष्यात मागे घेतलेले कृषी कायदे पुन्हा परत येऊ शकतात असे संकेत नरेंद्र सिंग तोमर यांनी दिले.

You might also like