लाॅकडाउनमुळे कांदाट खोर्‍यातील नागरिकांची चूल बंद, पर्यटक नसल्याने तापोळतील कृषी पर्यटनाला फटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तापोळा प्रतिनीधी | जगभर कोरोनो व्हायरसच्या माहमारीने हाहाःकार माजवला आहे. देशात कोरोनामुळे गेल्या १५ दिवसांपासुन लाॅकडाऊन सुरु आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार पार गेली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही १ हजारांवर पोहोचत आला आहे. कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम पडत आहे. हातावर पोट असणाऱ्यांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे. सह्याद्रीच्या पर्वत रागेमध्ये विखुरलेल्या ११० कीलोमीटरच्या शिवसागर जलाशयात स्थानिक भुमीपुत्र बोटींग व जलाशयाच्या तिरावर कृषी पर्यटन करुन गुजरन करत असतात. मात्र गत १५ दिवसांपासून लाॅकडाऊन सुरु झाल्सामुळे पर्यटक न फिरकल्याने तापोळा विभागातील बोटींगक्लब व कृषी पर्यटनावर मोठा परीणाम झाला असुन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

तापोळा बोटींग क्लबमध्ये ४५० बोटी असुन शिवसागर जलाशयाच्या तिरावर ३५ कृषी पर्यटन आहेत. कोयना धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील कांदाट खोऱ्यात असणाऱ्या अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी बोटिंग हा एकमेव रोजगाराचा मार्ग आहे. स्थानिक भुमीपुत्रांनी स्थानिक सहकारी बँका, सरकारी बँकेच्या माध्यामातून आर्थिक उलाढालीतुन कृषी पर्यटने उभारली आहेत. मार्च ते मे या महीन्यामध्ये महाष्ट्रातुन अंदाजे पाच हजार पर्यटक तापोळासह शिवसागर जलाशयाच्या विस्तीर्ण पट्ट्यांला भेट देतात. मात्र देशात लाॅकडाऊनमुळे तापोळ सह पर्यटनावर परिणाम झाल्याने बोटमालक हवालदिल झाले आहेत. यामुळे बोटींगचा व्यवसाय कोलमडला आहे.

स्थानिक भुमीपुत्रांवर हालीखीची परीस्थीत उद्भवली असताना भैागोलीक असमानता कांदांटी खोर्यात शेतीव्यवसाय नसुन फक्त भातपीक हेच एकमेव पीक घेतले जाते. पर्यटकांच्या जीवावर जलाशयाच्या पाण्यावर पर्यटकांच्या माध्यातुन जीवनचरित्र चालवणार्‍या तापोळा व परीसरातील हजारो लोकांची चुल लाॅकडाऊनमुळे बंद पडल्याने नजीकच्या काळात तापोळा येथील पर्यटनाला कठीण प्रसांगाचा सामना करावा लागणार हे मात्र निश्चित आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली ७८१ वर

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग

कोरोनापासून वाचण्यासाठी घरच्या घरी ‘असा’ बनवा मास्क

शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार

 

Leave a Comment