Agriculture Subsidy | पशुपालकांना हायड्रोपोनिक्स शेतीसाठी मिळणार 50 टक्के अनुदान, येथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agriculture Subsidy | आजकाल शेती करण्याच्या अनेक नवनवीन पद्धती उपलब्ध झालेल्या आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देखील शेती केली जाते. त्यामुळे आता भारतातील शेतकरी हा प्रगतशील शेतकरी बनलेला आहे. अशातच शेती करण्याची एक नवीन पद्धत आलेली आहे. त्याला हायड्रोपोनिक्स शेती असे म्हणतात. महाराष्ट्र सरकारने जनावरांच्या चाऱ्यासाठी जे लोक हायड्रोपोनिक्स शेती करतात, त्या शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे. या जमीन तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने ही एक मोठी घोषणा केलेली आहे. आता आपण या हायड्रोपोनिक्स (Agriculture Subsidy)शेतीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

हायड्रोपोनिक्स शेती म्हणजे काय?

हायड्रोपोनिक्स हा एक ग्रीक शब्द आहे. याचा अर्थ पाण्यात काम करणे. म्हणजेच या तंत्रज्ञानात मातीशिवाय झाडे ही केवळ पाण्यामध्ये वाढवली जातात. केवळ पाण्यामध्ये ही शेती केली जाते. यावेळी पाईपला वरून छिद्र पडून त्यात रोपे लावली जातात. आणि पाईपमधील पाण्यातून रोपांना आवश्यक अशी पोषक द्रव्य दिली जातात. आज-काल अनेक लोक या पद्धतीचा वापर करून शेती करत आहेत.

हायड्रोपोनिक्स शेतीचे फायदे | Agriculture Subsidy

या शेतीमुळे कमी पाण्याचा वापर कमी होतो. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. तसेच शेतीवर होणाऱ्या रोगाचा तसेच किडीचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. खास गोष्ट म्हणजे तुम्हाला वर्षभर ही शेती करता येते. अगदी कमी जागेत तुम्ही खूप जास्त उत्पन्न घेऊ शकता.

अनुदान कसे मिळवायचे?

तुम्ही देखील हायड्रोपोनिक्स शेतीमध्ये गुंतवणूक करत असाल, तर त्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुमच्या राज्यात उपलब्ध असलेल्या अनुदानाने योजना शोधावी लागेल. यासाठी अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्राची माहिती वेबसाईटवर उपलब्ध होईल

या योजनेमुळे शेतकऱ्यांना हायड्रोपोनिक्स शेती स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळेल

सरकार देणार असलेले 50 टक्के अनुदान हे केवळ जनावरांच्या चाऱ्यासाठी हायड्रोपोनिक्स शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. या अनुदानाची रक्कम आणि अटी या राज्यानुसार बदलणार आहेत. याबद्दल सविस्तर माहितीसाठी तुम्ही राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा.