“अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे उद्घाटन गनिमी काव्याने होणार” – गोपीचंद पडळकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे उद्घाटन येत्या 27 रोजी आ. गोपीचंद पडळकर हे पोलीस व प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गनिमी काव्याच्या पद्धतीने करण्याची शक्यता आहे. याच पद्धतीने त्यांनी आटपाडी तालुक्यातील झरे येथे बैलगाडी शर्यत घेऊन दाखविली होती.

दरम्यान पालकमंत्री जयंत पाटील व पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी आपल्याला विनयभंगाच्या अथवा तत्सम गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचे षड्यंत्र रचले असल्याचा गंभीर आरोप आ. गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पुण्यश्लोेक आहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या उद्घाटनाचा वाद राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सुरू झाल्याने जिल्हा प्रशासनाने स्मारकाच्या ठिकाणी दोन एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. प्रशासनाने स्मारकाकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले असून त्याठिकाणी पत्रे मारले आहेत.

Leave a Comment