Ahilyanagar Expressway : नाशिक-अहिल्यानगरला बूस्ट देणारा नवा 6-पदरी महामार्ग! गडकरींची मोठी घोषणा, ‘हा’ रस्ता गेमचेंजर ठरणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ahilyanagar Expressway : महाराष्ट्राच्या रस्ते विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पडणार आहे. नाशिक विभागाला जोडणारा एक अत्याधुनिक सहापदरी महामार्ग लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची अधिकृत घोषणा करत जिल्ह्यातील नागरिकांना एक दिलासादायक बातमी दिली आहे.

गडकरींच्या नेतृत्वाखाली देशभरात वेगाने विस्तारत असलेल्या महामार्ग नेटवर्कमध्ये आता मालेगाव – मनमाड – येवला – कोपरगाव मार्गाचा समावेश होणार आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण मार्ग ‘फुल काँक्रीट’ तंत्रज्ञानावर आधारित असेल आणि भविष्यातील ट्रॅफिक प्रेशरला तोंड देण्यास सक्षम असेल.

रस्ता कुठून कुठपर्यंत? (Ahilyanagar Expressway)

हा महामार्ग मालेगावपासून सुरू होऊन कोपरगावपर्यंत जाणार आहे, ज्यामध्ये मनमाड आणि येवला यांसारखी महत्त्वाची शहरे जोडली जातील. या मार्गाचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) लवकरच तयार करण्यात येणार असून, गडकरींनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.

समीर भुजबळांचा पुढाकार, गडकरींचा तत्काळ प्रतिसाद

माजी खासदार समीर भुजबळ यांनी नाशिक विभागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या प्रकल्पाबाबत गडकरी यांची भेट घेतली होती. छगन भुजबळ (Ahilyanagar Expressway) यांच्या मार्गदर्शनाखाली ही मागणी मांडण्यात आली. त्यानंतर गडकरींनी लगेचच डीपीआरची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

तीन नवीन रोड ओव्हर ब्रिज देखील मंजुरीच्या मार्गावर

केवळ महामार्गच नाही, तर येवला शहरातील तीन रेल्वे क्रॉसिंग – नांदगाव रोड, नागडे रोड आणि नांदेसर रोड येथे नवीन रोड ओव्हर ब्रिज (ROB) देखील उभारण्यात येणार आहेत. हे प्रकल्प ‘सेतुबंधन योजने’च्या माध्यमातून राबवले जाणार असून राज्य शासनाकडून तातडीने प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

कुंभमेळ्याची तयारी सुरूच

हा महामार्ग भविष्यातील नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यात्रेकरूंना जलद आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय मिळवून देणारा हा रस्ता वाहतुकीसाठी ‘लाइफलाइन’ ठरेल, असा विश्वास प्रशासन व्यक्त करत आहे. नाशिक आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी हा सहापदरी महामार्ग आणि ओव्हर ब्रिज प्रकल्प औद्योगिक, धार्मिक आणि स्थानिक विकासाचा नवा अध्याय उघडणार आहे. गडकरींच्या निर्णायक नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या रस्त्यांचा चेहरामोहरा पुन्हा एकदा बदलतोय, हे निश्चित.