बिबट्याला पाहून हृदयविकाराचा झटका; महिलेचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शेतात काम करत असताना अचानक बिबट्याला पाहून हृदयविकाराचा झटका आल्याने एका ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील जाखोरी शिवारात शनिवारी घडली. शीलाबाई लहानू पानसरे असे मृत महिलेचे नाव आहे.

शीलाबाई शनिवारी (२५ जानेवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास जाखोरी शिवारातील आपल्या गट नंबर ४०७ मधील शेतात नेहमी प्रमाणे काम करत होत्या. त्यांना अचानक त्याच्या समोर बिबट्या दिसला. अचानक समोर बिबट्याचे दर्शन झाल्याने घाबरून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबबत तत्काळ वनविभागाला कळवण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच संगमनेर भाग १ चे वनक्षेत्रपाल निलेश आखाडे, वनरक्षक एस आर पाटोळे यांसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थांची गर्दी करीत वनविभागावर आपला संताप व्यक्त केला. तसेच ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत मयताच्या कुटुंबियांना वनविभागाकडून मदत मिळण्याची मागणी केली.