अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात ६ उमेदवारांच्या निवडणूक खर्चात तफावत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी । अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात आज निवडणुक खर्च निरीक्षक दिक्षित यांच्याकडुन १२ उमेदवारांची निवडणुक खर्चाच्या वेळापत्रकानुसार खर्चाची दुसरी तपासणी पुर्ण करण्यात आली. या तपासणीमध्ये ६ उमेदवारांच्या खर्च अहवालामध्ये खर्चामध्ये तफावत आढळून आली आहे.

निवडणूक रकमेत तफावत निदर्शनास आलेल्या उमेदवारांपैकी शिवसेनेचे उमेदवार अनिल रामकिसन राठोड यांच्या खर्चातील तफावत १२२०८६ आहे. भाकपचे उमेदवार बहिरनाथ तुकाराम वाकळे यांच्या खर्चातील तफावत रक्कम रु.७४१३ इतकी आहे. अपक्ष उमेदवार श्रीपाद शंकर छिंदम यांच्या खर्चातील तफावत रक्कम रु. १४२९ एवढी आहे. एमआयएमचे उमेदवार मीर आसीफ सुलतान यांच्या खर्चात तफावत रक्कम रू. ५५६८ आहे. श्रीधर जाखुजी दरेकर, तफावत रू. २२८८ एवढी आहे. तर संदीप लक्ष्मण सकट, तफावत रक्कम रु. ३२७० इतकी आहे.

उपरोक्त ६ उमेदवारांना नोटीसा देऊन योग्य त्या पुराव्यासह २४ तासात खुलासा सादर करण्याचे निर्देश निवडणूक विभागान दिलेत. तसेच पुढील उमेदवारांची खर्चाची तपासणी दि. १८  तारखेला होणार आहे. त्यामुळे या उमेदवारांचे आता धाबे दणाणले आहे.

Leave a Comment