हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडकडून (AI Airport Services Limited) भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यात एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड 3256 पदांसाठी तरुणांची भरती करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करावे लागणार आहेत?? तसेच शैक्षणिक पात्रता काय हवी?? याविषयी जाणून घ्या.
एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड हँडीमॅन, सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट अशा एकूण 3256 पदांसाठी तरुणांची भरती करणार आहे. सर्वात खास बाब म्हणजे यासाठी उमेदवारांना कोणतेही परीक्षा द्यावी लागणार नाही. कारण थेट मुलाखतीमधून उमेदवारांची निवड केली जाईल. ही मुलाखत येत्या 12, 13, 14, 15, 16 जुलै 2024 रोजी घेण्यात येणार आहे. सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 वेळेत अधिकाऱ्यांकडून मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीत निवडलेल्या उमेदवारांना चांगला पगार देण्यात येईल.
लक्षात घ्या की, प्रत्येक एका पदांनुसार शैक्षणिक पात्रतेची अट ठेवण्यात आली आहे. तसेच 18 ते 55 वयोगटातील उमेदवारच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या साईटवर देण्यात आली आहे. त्यामुळे ही माहिती सविस्तर वाचावी आणि त्यानंतरच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. तसेच, मुलाखतीला जाण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत.