हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तंत्रज्ञानातील अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. आता याच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन पुणे स्टेशनवरील सुरक्षा आणखीन वाढवली जाणार आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर लवकरच इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. हे AI कॅमेरे स्टेशनच्या परिसरावर बारीक लक्ष ठेवायचे काम करतील. यामुळे सुरक्षा यंत्रणेचे काम देखील सोपे होण्यास मदत होईल.
एआय कॅमेरे बसवल्यामुळे परिसरातील बारीक गोष्टी टिपल्या जाणार आहेत. जर कॅमेरेत काही संशयास्पद आढळून आले तर रेल्वे प्रशासनाला लगेच कळेल आणि त्वीत कारवाई करण्यात येइल. पुणे रेल्वे स्टेशनवर सुरुवातीचे 30 दिवस हे कॅमेरे बसवण्यात यतील. जर याचा रिझर्ट चांगला आला तर पुढे हे कॅमेरे कायम ठेवले जातील. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने आपल्या कामाचा जोर वाढवला आहे. यामध्ये जास्त नवीन तंत्रज्ञान वापरण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी मंत्रालयान वेगवेगळ्या विभागाकडून प्रस्ताव मागवले आहेत. पुणे विभागाने यात 7 आराखडे सादर केले आहेत. त्यामध्ये दक्षता यंत्रणेच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. पुणे रेल्वे विभगाकडून स्टेशनव कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. ज्याला मंजूरी मिळाली आहे.
जिओ प्लॅटफॉर्मच्या जिओ थिंग्ज लिमिटेडनेकडे या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. सुरुवातील पुणे रेल्वे स्टेशन परिसरात चार इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे एंट्री आणि एक्झिट गेट्स आणि तिकीट आरक्षण खिडक्यांवर बसवले जाणार आहेत. यामुळे सर्व बाजूच्या लोकांवर लक्ष ठेवले जाईल. हे कॅमेरे लोकांच्या हालचाली, कृती टिपतील. या कॅमेरावंर सुरश्रा यंत्रणा सतत लक्ष ठेवून असेल. दरम्यान यापूर्वी पुणे स्टेशनवर बॉम्ब सदृष्य वस्तू सापडल्याचे समोर आले होते. मध्यंतरी दोन वेळा पुण्यातील वेगवेगळ्या भागात बॉम्ब ठेवल्याचे फोन कॉल आले होते. ज्यामुळे प्रशासनाचा गोंधळ उडाला. या सर्व बाबी लक्षात घेऊन पुणे रेल्वे स्टेशनवर एआय कॅमेरे बसवले जात आहेत.