औरंगाबाद | एवढी वर्षे अभ्यास करून मेहनत करून ऍलोपॅथीचे डॉक्टर घडतात. हजार रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करतात. परंतु तरीही ऍलोपॅथी विरुद्ध बोलले जाते. योगगुरू बाबा रामदेव यांनी अलोपॅथीबद्दल जे वक्तव्य केले आहे, त्यामुळे ऍलोपॅथी डॉक्टरांचे मन दुखावले असून त्यामुळे योग गुरु यांनी विरोधक जे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने काळया फिती लावून डॉक्टरांनी निषेध व्यक्त केला. तसेच आयएमए हॉलमध्ये निषेध सभा घेऊन योग गुरू बाबा रामदेव यांनी जाहीर माफी मागा… माफी मागा.. अशी मागणी केली.
आज पूर्ण दिवस काळया फिती लावून निषेध व्यक्त केला. तसेच देशात रोग नियंत्रण कायदा लागू केला आहे. त्यात जर कोणी चुकीची माहिती पसरवित असेल तर त्याला अटक होऊ शकते तर असे चुकीचे वक्तव्य करून चुकीच्या पद्धतीने माहिती पसरवून गैरसमज निर्माण करणार्यांवर कारवाई का होत नाही? असा संतप्त सवाल देखील यावेळी डॉक्टरांनी उपस्थित केला.
तसेच योगगुरू बाबा रामदेव यांनी त्वरित माफी मागा अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष करंजकर, सचिव डॉ. यशवंत गाडे, डॉ. उज्वला दहिफळे, डॉ. सत्यनारायण सोमाणी, डॉ.अनिपम टाकळकर, डॉ. रश्मी बोरीकर, डॉ. राजेंद्र शेवाळे, डॉ. अरुण मारवाले, डॉ. उज्वला झंवर, डॉ. अर्चना भांडेकर यांच्यासह आदी डॉक्टरांनी सहभाग नोंदवला होता.