हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Air India Freedom Sale। मित्रानो, विमानातून प्रवास करण्याची इच्छा तर प्रत्येकाची असते, परंतु विमानाचे तिकीट महाग असल्याने अनेक मध्यमवर्गीय लोकांचे विमानातून सफर करण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते. परंतु आता हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. कारण देशातील आघाडीची विमान कंपनी एअर इंडियाने आपल्या प्रवाशांसाठी एक खास ऑफर आणली आहे. १५ ऑगस्टला भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन असून यानिमित्ताने स्वस्तात मस्त आणि अतिशय कमी पैशात विमान प्रवासाची संधी एअर इंडिया घेऊन आली आहे. हि ऑफर नेमकी आहे तरी काय? तुम्ही किती रुपयांत विमानातून उड्डाण करू शकता? आणि कोणत्या कालावधीत तुम्हाला हि सदर करता येणार आहे याबाबत संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊयात.
१५ ऑगस्टपर्यंत बुकिंग करावं लागेल- Air India Freedom Sale
तर भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एअर इंडियाने ‘फ्रीडम सेल’ची (Air India Freedom Sale) घोषणा केली. या सेलअंतर्गत, ५० लाख प्रवाशांना देशांतगर्त आणि आंतरराष्ट्रीय अशी दोन्ही उड्डाणे करता येणार आहे. देशांतर्गत प्रवास करायचा असेल तर सुरुवातीची किंमत आहे १,२७९ रुपये तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी ४,२७९ रुपये मोजावे लागतील. एअर इंडियाने एका निवेदनात म्हंटल आहे कि या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला १५ ऑगस्टपर्यंत बुकिंग करावं लागेल. तर या बुकिंगच्या माध्यमातुन १९ ऑगस्ट २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत प्रवास करता येणार आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि आणि मोबाइल अँपवर जाऊन तुम्हाला बुकिंग करावं लागेल.
१९ ऑगस्ट २०२५ ते ३१ मार्च २०२६ दरम्यान ओणम, दुर्गा पूजा, दिवाळी आणि ख्रिसमस यांसारखे प्रमुख भारतीय सण आहेत. त्यामुळे या काळात लांबच्या प्रवाशांना त्यांच्या घरी जाताना एअर इंडियाच्या या ऑफरचा (Air India Freedom Sale) नक्कीच फायदा होऊ शकतो . मात्र ही ऑफर फक्त पूर्णपणे बुक केलेल्या आणि रद्द न करता येणाऱ्या बुकिंगवर लागू आहे. तिकीट रद्द केल्यास, सवलतीची रक्कम परत केली जाणार नाही आणि फ्रीडम सेल ऑफर अंतर्गत बुकिंग वैध राहणार नाही. ही ऑफर मर्यादित जागांसाठी आहे आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध आहे याचीही नोंद प्रवाशांनी घेणं गरजेचं आहे.




