व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

एअर इंडियाला मिळाला नवा एमडी-सीईओ; आता ‘या’ दिग्गजाच्या हाती आली महाराजाची कमान

नवी दिल्ली । टाटा सन्सने तुर्की एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष इल्कर आयसी यांची एअर इंडियाचे नवीन एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 1 एप्रिल 2022 पासून ते आपली जबाबदारी स्वीकारतील. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन हेही बोर्डाच्या बैठकीत उपस्थित होते. बोर्डाने त्यांच्या नावावर चर्चा करून मान्यता दिली.

इल्कर आयसीच्या नियुक्तीसाठी सर्व नियामक संस्थांकडून मंजुरी घेणे बाकी आहे. टाटा ग्रुपने अलीकडेच एअर इंडियामधील 100 टक्के भागभांडवल 18,300 कोटी रुपयांना विकत घेतले. हा करार 27 जानेवारीला पूर्ण झाला आणि त्या दिवसापासून टाटा सन्स मालक झाले.

आयसी पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी होते
51 वर्षीय इल्कर आयसी हे तुर्कीतील बिलकेंट यूनिवर्सिटीच्या पॉलिटिकल सायन्स आणि पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटच्या 1994 च्या बॅचचे माजी विद्यार्थी आहेत. 1995 मध्ये त्यांनी इंग्लंडमधील लीड्स विद्यापीठात पॉलिटिकल सायन्सवर एक रिसर्च प्रोजेक्ट केला. 1997 मध्ये त्यांनी इस्तंबूलमधील मारमारा विद्यापीठातून इंटरनॅशनल रिलेशंस मास्टर्स प्रोग्राम पूर्ण केला.

जगातील सर्वोत्तम एअरलाईन्स बनवणार
द वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, IC तुर्की फुटबॉल फेडरेशन, तुर्की एअरलाइन्स स्पोर्ट्स क्लब आणि टीएफएफ स्पोर्टिफ एनोनिम सिरकेटीचे बोर्ड मेंबर आहेत. ते कॅनेडियन तुर्की व्यवसाय परिषद आणि यूएस-तुर्की बिझनेस काउंसिलचे देखील मेंबर आहेत. आयसी यांनी सांगितले की,” आघाडीच्या आयकॉनिक एअरलाइन्सचे नेतृत्व करताना आणि टाटा ग्रुपमध्ये सामील होताना मला खूप आनंद होत आहे. एअर इंडियाचा मजबूत वारसा आम्ही वापरणार आहोत. जगातील सर्वोत्तम विमान कंपनी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे.