हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| विमान कंपनी एअर इंडियाने (Air India Flight) आपल्या सर्व प्रवाशांसाठी एक खास सुविधा आणली आहे. या सुविधेमुळे आता प्रवाशांना विमानाच्या भाड्यावर नियंत्रण ठेवता येणार आहे. याबाबतची माहिती देत एअर इंडियाने सांगितले आहे की, कंपनीने प्रवाशांसाठी फेअर लॉक (Fair Lock) सुविधा आणली आहे. या सुविधेमार्फत ते एअर लाइनवर तब्बल 48 तासांसाठी तिकीटाचे भाडे लॉक करू शकतात, परंतु यासाठी त्यांना शुल्क भरावे लागेल. यानंतर त्यांना या नव्या सुविधेचा लाभ घेता येईल.
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा बुकिंगच्या तारखेपासून किमान 10 दिवस दूर असलेल्या फ्लाइट पर्यायांसाठी उपलब्ध असेल. या सुविधेसाठी ग्राहकांना त्यांच्या पसंतीचा फ्लाइट पर्याय निवडावा लागेल. यानंतर त्यांना बुकिंग फ्लोमध्ये भाडे लॉक पर्याय निवडावा लागेल. पुढे नॉन रिफंडेबल फी भरावी लागेल. प्रवासीनंतर ‘बुकिंग व्यवस्थापित करा’ पर्यायाद्वारे त्यांच्या बुकिंगवर परत येऊ शकतात.
फेअर लॉकची वैशिष्ट्ये
1) फेअर लॉक कालावधीदरम्यान बुकिंगमध्ये कोणताही बदल केला जाऊ शकत नाही.
2) एअर इंडियाच्या वेबसाइटवरून बुक केलेल्या एअर इंडियाच्या फ्लाइटसाठीच भाडे लॉक करता येऊ शकते.
3) फेअर लॉकसाठी दिलेले शुल्क परत मिळणार नाही.
एवढे शुल्क भरावे लागेल
आपल्या प्लॅनिंगनुसार प्रवासी 2 दिवसांसाठी भाडे लॉक करू शकतील. यामुळे मधल्या काळात तिकिटाच्या रकमेत वाढ झाली तरी प्रवाशांना लॉक केलेले भाडे भरावे लागेल. परंतु फ्लाईट बुक करताना प्रवाशांना या सुविधेसाठी पाचशे रुपये भरावे लागतील. तर आंतरराष्ट्रीय फ्लाइटसाठी 850 आणि
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी 1500 रुपये भरावे लागतील.