Air India च्या जेवणात सापडलं ब्लेड; कंपनीने मान्य केली चूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध विमान कंपनी Air India च्या जेवणात प्रवाशाला चक्क ब्लेड सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेंगळुरूहुन सॅन फ्रान्सिस्कोला प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या जेवणात हा प्रकार घडला. यानंतर कंपनीने आपली चूक मान्य केली आहे. एअर इंडियाचे मुख्य ग्राहक अनुभव अधिकारी, राजेश डोग्रा यांनी याबाबत कंपनीची बाजू मांडत सांगितलं की ही वस्तू त्यांच्या केटरिंग पार्टनरने वापरलेल्या भाजीपाला प्रक्रिया मशीनमधून आली आहे.

प्रवाशाने सोशल मीडियावर शेअर केला होता ब्लेडचा फोटो

मॅथुरेस पॉल या प्रवाशाने X वर जेवणाच्या डब्यात सापडलेल्या ब्लेडचा फोटो शेअर करत संताप व्यक्त केला . त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हंटल, एअर इंडियाचे खाद्यपदार्थ आपल्याला सुद्धा कट करू शकतात. रताळे आणि अंजीर चाटमध्ये एक धातूचा तुकडा लपविला होता जो ब्लेडसारखा दिसत होता. अन्न काही सेकंद चघळल्यानंतर मला हे समजले. सुदैवाने कोणतेही नुकसान झाले नाही. अर्थात, दोष पूर्णपणे एअर इंडियाच्या केटरिंग सेवेचा आहे, परंतु या घटनेने माझ्या मनातील एअर इंडियाची प्रतिमा डागाळली आहे. एखाद्या मुलाने हे धातू खाल्ले असते तर काय झाले असते? असा सवालही या प्रवाशाने केला.

या एकूण घटनेनंतर एअर इंडियाचे मुख्य ग्राहक अनुभव अधिकारी, राजेश डोग्रा यांनी सांगितले की, एअर इंडिया या गोष्टीला दुजोरा देते कि आमच्या फ्लाइटपैकी एका प्रवाशाच्या जेवणात धातूची वस्तू आढळली. तपासा अंतर्गत असे आढळून आले की ते आमच्या केटरिंग पार्टनरच्या सुविधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाजीपाला प्रक्रिया मशीनमधून आले आहे. आम्ही, आमच्या खानपान पार्टनरसह अशा कोणत्याही घटना टाळण्यासाठी उपाययोजना मजबूत केल्या आहेत.