Air India Plane : आणखी एका Air India विमानात बिघाड; टेक ऑफ केलं, अन काही वेळातच …

Air India Plane
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Air India Plane । अहमदाबाद विमान अपघाताची घटना अजूनही ताजी असतानाच आता आणखी एका एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. सदर विमान हे हॉंगकॉंग वरून मुंबईला येणार होते. विमानाने टेक ऑफ सुद्धा केलं, मात्र या विमानात काही तांत्रिक बिघाड असल्याचं वैमानिकाच्या लक्षात आलं आणि प्रसंगावधान दाखवून वैमानिकाने पुन्हा एकदा विमानतळावर माघारी फिरत विमानाचे लँडिंग केलं. यामुळे मोठी दुर्घटना टळली तसेच विमानातील प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे हे बोइंग 787-8 ड्रीमलायनर विमान (Air India Plane) होतं. फ्लाईट क्रमांक AI315 ने हाँगकाँगहून वेळेवर उड्डाण केले. परंतु टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच पायलटला सिस्टममध्ये काही बिघाड आढळला. अशा परिस्थितीत, विमानाला हवेतच परतावे लागले आणि हाँगकाँग विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत, हा तांत्रिक बिघाड काय आहे? ते अजून स्पष्ट झालेलं नाही. तांत्रिक पथक विमानाची तपासणी करत आहे.

शनिवारीही तांत्रिक बिघाड- Air India Plane

यापूर्वी, शनिवारी गुवाहाटीहून कोलकाताला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानातही (Air India Plane) तांत्रिक बिघाड झाला होता. तांत्रिक बिघाडामुळे विमान उतरवण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान IX-1226 हे शनिवारी रात्री 9.20 वाजता गुवाहाटीच्या लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय (LGBI) विमानतळावरून एकूण 170 प्रवाशांसह निघणार होते.

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे एअर इंडियाच्या विमानाबद्दल लोकांच्या मनात राग येऊ लागला आहे. एअर इंडियाच्या विमानांचा मेन्टेनस, वैमानिकांची ट्रेनिंग यावर लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. अनेक लोकांनी सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये बदल आणि व्यवस्थापनचा उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एअर इंडियाच्या बोइंग 787 ड्रीमलायनर विमानावर शंका उपस्थित केली होती, तसेच सरकारलाही खडेबोल सुनावले.