हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Air India Plane Crash । अहमदाबाद विमान अपघाताने संपूर्ण देश हळहळतोय. २४२ प्रवाशांसह उड्डाण केलेले एअर इंडियाचे विमान अवघ्या ३० सेकंदात कोसळलं. विमान कस कोसळले याचे विडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा आला असेल. या विमानात एक प्रवासी वगळता इतर सर्वांचा मृत्यू झाला आहे. एका क्षणात होत्याच नव्हतं झालं… संपूर्ण देशाला हादरवणारा हा विमान अपघात नेमका कसा झाला? याचा तपास आता केला जातोय. मात्र त्याच दरम्यान, विमान अपघाताबाबत भविष्यवाणी झालेली एक पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हि पोस्ट काय आहे? विमान अपघाताची भविष्यवाणी कोणी केली होती? ते जाणून घेऊयात.
कोणी केली होती विमान अपघाताची भविष्यवाणी- Air India Plane Crash
प्रसिद्ध ज्योतिषी शर्मिष्ठा यांनी विमान अपघाताबाबत भविष्यवाणी करणारे ट्विट ६ महिन्यापूर्वी केलं होते. २९ डिसेंबर २०२४ रोजी केलेल्या ट्विट मध्ये त्यांनी म्हंटल कि, २०२५ मध्ये विमान वाहतूक क्षेत्र चांगले काम करेल, परंतु विमान अपघाताच्या बातम्या आपल्याला धक्का देऊ शकतात, विमान वाहतूक क्षेत्रात थोडी सुधारणा आधीच सुरू झाली आहे. जेव्हा गुरु ग्रह मृगशिरा आणि अर्द्राच्या मिथुन भागात असेल आणि दरमहा सुमारे ६.५ अंश वेगाने असेल, तेव्हा विमान वाहतूक भरभराटीला येईल परंतु सुरक्षितता कमी असेल असं ट्विट ज्योतिषी शर्मिष्ठा यांनी केलं होते, जे आज खरं होताना दिसतंय. अहमदाबाद विमान अपघातानंतर (Air India Plane Crash) शर्मिष्ठा यांचे हे जुने ट्विट पुन्हा एकदा सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं. अनेक लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट्स करत म्हंटल की इतकी अचूक भाकित? तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले, ग्रह-तारे खरोखरच आपल्या उड्डाणांचा मार्ग ठरवत आहेत का?

दरम्यान, गुजरातमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर (Air India Plane Crash) संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. विमान क्रॅश होण्यापूर्वी पायलटने Mayday!! Mayday!! Mayday असा संदेश जवळच्या एटीसीला दिला होता. मात्र तोपर्यंतच हे कोसळलं. या विमानात एकूण 242 प्रवासी होते, ज्यात 2 पायलट आणि 10 केबिन क्रू होते. हे विमान कॅप्टन सुमित सभरवाल चालवत होते, तर त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर होते. एक प्रवासी वगळता इतर सर्वाना या अपघातात प्राण गमवावे लागलेत. सध्या या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम वेगाने केले जात आहे. मृतदेह जळालेले असल्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता नातेवाईकांना डीएनएचा नमुना देऊन ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.