हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Air India Plane crash Report । अहमदाबाद विमान अपघाताबाबत अमेरिकन एव्हीएशन तज्ञांच्या रिपोर्टमध्ये खळबळ जनक दावा करण्यात आला आहे. खरं तर यापूर्वी भारताच्या AAIB च्या अहवालानुसार, इंधनाला पुरवठा होणारा स्विच बंद झाल्याने हा विमान अपघात झालं असं सांगण्यात आलं आहे. हा स्विच कोणी बंद केला? जाणूनबुजून कोणी बंद केला कि काही तांत्रिक कारणामुळे ऑटोमॅटिकतो बंद पडला याबाबत चौकशीच सुरु आहे. मात्र याच दरम्यान, अमेरिकन रिपोर्टनुसार, विमानाच्या पायलटनेच हे स्विच बंद केले असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
काय म्हंटल अमेरिकन रिपोर्ट मध्ये ? Air India Plane crash Report
अमेरिकन वृत्तपत्र ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ ने दावा केला आहे की बोईंग ७८७ ड्रीमलायनर उडवणारे फर्स्ट ऑफिसर सुमित सभरवाल यांनी इंजिनांना इंधन पुरवठा थांबवला होता. अमेरिकन मीडियाने दोन्ही पायलटमधील संभाषणाच्या कॉकपिट रेकॉर्डिंगवरून हा दावा केला आहे. व्हॉइस रेकॉर्डिंगवरून असे दिसून आले की सह-वैमानिक क्लाइव्ह कुंदर यांनी कॅप्टन सुमित सभरवाल यांना विचारले, “तुम्ही इंधन स्विच CUTOFF स्थितीत का ठेवला? हे विचारताना कुंदर हे प्रचंड घाबरले होते.. त्यांचा आवाजही लहान येत होता. तर दुसरीकडे कॅप्टन सुमित सभरवाल मात्र शांतच होते. खरं तर सुमित सभरवाल एअर इंडिया विमानाचे वरिष्ठ पायलट होते. त्यांना १५,६३८ तास उड्डाणाचा अनुभव होता आणि सह-वैमानिक क्लाइव्ह कुंदर यांना ३,४०३ तास उड्डाणाचा अनुभव होता.
अमेरिकन रिपोर्टमुळे (Air India Plane crash Report) संपूर्ण जगात खळबळ उडाली असली तरी भारत सरकारने अद्याप या दाव्याची पुष्टी केलेली नाही. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एअरलाइन पायलट्स असोसिएशन आणि इंडियन पायलट्स असोसिएशन (FIP) ने देखील या अहवालावर आक्षेप व्यक्त केला आहे. खरं तर यापूर्वीच्या RTI अहवालातच हे स्पष्ट झालं होते कि भारतात गेल्या ५ वर्षांत उड्डाणादरम्यान इंजिन बंद पडल्याचा प्रकार ६५ वेळा घडला आहे. याचाच अर्थ बोईंगच्या विमानामध्येच काहीतरी गडबड असणार.. अशावेळी बोईंगच्या त्रुटी लपवण्यासाठीच या अपघातासाठी वैमानिकांना जबाबदार धरण्यात येत आहे का? असाही सवाल उपस्थित झालाय.
विमान अपघाताबाबत भारताच्या रिपोर्टमध्ये काय म्हंटल?
एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने जारी केलेल्या अहवालात (Air India Plane crash Report) असे म्हटले आहे की उड्डाणानंतर काही सेकंदात दोन्ही इंजिनचे इंधन अचानक बंद झाले. त्यामुळे विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि क्रॅश झाले. विमानाच्या “ब्लॅक बॉक्स” रेकॉर्डरमधून ४९ तासांचा उड्डाण डेटा आणि अपघातातील दोन तासांचा कॉकपिट ऑडिओ डेटा काढण्यात आल्यानंतर याबाबतचा खुलासा झाला. अहवालानुसार, दोन्ही इंजिनांचे इंधन कटऑफ स्विच “०१ सेकंदाच्या अंतराने एकामागून एक RUN वरून CUTOFF स्थितीत बदलले गेले तेव्हा विमानाचा वेग १८० नॉट्सवर पोहोचला होता,” असे म्हटले आहे. कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये, एका वैमानिकाला विचारताना ऐकू येते की त्याने कटऑफ का केला. दुसऱ्या वैमानिकाने मी कट ऑफ केलं नाही असं उत्तर दिले.




