Air India Plane Crash Report : अहमदाबाद विमान अपघात कशामुळे झाला? धक्कादायक अहवाल समोर

Air India Plane Crash Report
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Air India Plane Crash Report । अहमदाबाद विमान अपघात कसा झाला याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरं तर या विमान अपघाताला १ महिना पूर्ण झाला आहे. मागील महिनाभरापासून या विमान अपघाताबाबत चौकशी आणि तपास सुरु होता. आता एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने जारी केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की उड्डाणानंतर काही सेकंदात दोन्ही इंजिनचे इंधन अचानक बंद झाले. त्यामुळे विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि क्रॅश झाले. विमानाच्या “ब्लॅक बॉक्स” रेकॉर्डरमधून ४९ तासांचा उड्डाण डेटा आणि अपघातातील दोन तासांचा कॉकपिट ऑडिओ डेटा काढण्यात आल्यानंतर याबाबतचा खुलासा झाला आहे.

नेमकं काय घडलं? Air India Plane Crash Report

अहवालानुसार, दोन्ही इंजिनांचे इंधन कटऑफ स्विच “०१ सेकंदाच्या अंतराने एकामागून एक RUN वरून CUTOFF स्थितीत बदलले गेले तेव्हा विमानाचा वेग १८० नॉट्सवर पोहोचला होता,” असे म्हटले आहे. कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये, एका वैमानिकाला विचारताना ऐकू येते की त्याने कटऑफ का केला. दुसऱ्या वैमानिकाने मी कट ऑफ केलं नाही असं उत्तर दिले. काही वेळातच, स्विचेस जिथे असायला हवे होते तिथे परत आणण्यात आले आणि जेव्हा अपघात झाला (Air India Plane Crash Report) तेव्हा इंजिन पुन्हा पॉवर अप करण्याच्या प्रक्रियेत होते.

खरं तर ७८७ ड्रीमलायनर आणि इतर व्यावसायिक विमानांमध्ये एकाच इंजिनवर टेकऑफ पूर्ण करण्यासाठी पुरेशी पॉवर असते आणि वैमानिक त्यासाठी सज्ज सुद्धा असतात. परंतु दोन्ही दोन्ही इंजिनचे इंधन अचानक बंद झाल्याने वैमानिक काहीच करू शकला नाही. इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही सेकंदांनी, वैमानिकाने “मेडे मेडे मेडे” असा कॉल दिला. एअर ट्रॅफिक कंट्रोलने कॉल साइनबद्दल चौकशी केली. परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि तोपर्यंत विमान खाली कोसळलं. Air India Plane Crash Report

अहवालात हेच स्पष्ट झालं आहे की दोन्ही इंधन स्विच अचानक बंद होणे हे या विमान अपघाताचे मुख्य कारण आहे. एएआयबी टीममध्ये पायलट, अभियंते, मानसशास्त्रज्ञ आणि तज्ञांचा समावेश आहे. ते अजूनही जास्तीत जास्त पुराव्यांचे विश्लेषण करत आहेत.