केंद्र सरकारचे आदेश डावलून विमान कंपन्यांची तिकिट बुकिंग सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जोपर्यंत करोनाची साथ पूर्णपणे आटोक्यात येत नाही तोपर्यंत एकही विमान उड्डाण घेणार नाही, असे स्पष्ट केले होते. सध्या देशात करोना विषाणूची साथ रोखण्यासाठी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. मात्र तरीही विमान कंपन्यांकडून मे आणि जून महिन्यातील आगाऊ तिकीट बुकिंग स्वीकारली जात असल्याचे समोर आले आहे.

देशातील आघाडीची विमान कंपनी असलेल्या इंडिगो बरोबर विस्तारा एअरलाईन्स, स्पाइस जेट आणि गो एअर या कंपन्यांच्या वेबसाइटवर तिकीट बुकिंग करण्याची सुविधा सध्या सुरु असल्याचे दिसून आले आहे. मात्र एअर इंडिया आणि एअर एशिया या कंपन्यांनी तिकिट बुकिंग प्रक्रिया थांबवली आहे. या सहा विमान कंपन्यांपैकी चार कंपन्यांकडून मे महिन्याचा तिसऱ्या आठवड्याची बुकिंग सुरु केली आहे. गो एअरने ९० टक्के कर्मचारी रजेवर पाठवले आहे मात्र तरीही कंपनीच्या वेबसाइटवर १६ मेपासून आगाऊ तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे बहुतांश विमान कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना विनापगारी रजेवर पाठवले आहे. काही कंपन्यांनी वेतनात मोठी कपात केली आहे. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी जून महिन्यापर्यंत लॉकडाऊन वाढवला तर विमान कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. भारतीय विमान कंपन्यांचे किमान ३.६ अब्ज डॉलरचे नुकसान होईल, असा अंदाज ‘सीएपीए’ या संस्थेने व्यक्त केला आहे.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews.

Leave a Comment