फक्त 899 रुपयांत करा विमान प्रवास; ‘या’ विमान कंपनीची जबरदस्त ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । तुमचा जर कुठे बाहेर प्रवासाला जाण्याचा प्लॅन असेल तर स्वतःत विमान प्रवासाची एक नामी संधी खास तुमच्यासाठी चालून आहे. ‘स्पाइसजेट’ (SpiceJet) ही विमान कंपनी सध्या फ्लाईट तिकीट बुकिंगवर मोठी सवलत देत आहे. स्पाइसजेट कंपनीने ‘बुक बेफिकर सेल’ या ऑफरची अंतिम तारीख आता वाढवली आहे. या ऑफर अंतर्गत देशात तुम्हाला केवळ 899 रुपयात विमान तिकीट मिळणार आहे. यासोबतच स्वस्त  तिकिटाव्यतिरिक्त तिकीट कॅन्सलेशन फी आणि व्हाऊचरवरदेखील पुढील उड्डाणांसाठी कंपनीकडून सूट दिली जात आहे. (domestic flight ticket only in 899)

स्पाइसजेटने जाहीर केलेल्या माहितीनुसार, आपण केवळ 899 रुपयात उड्डाणांचे तिकीट बुक करू शकता. तिकिट प्रवास दिवसाच्या 21 दिवस आधी तुम्ही कोणत्याही शुल्काशिवाय ते रद्द देखील करू शकता आणि प्रवासाची दिशा बदलू शकता. या ऑफर अंतर्गत तिकिट बुकिंग केल्यावर तुम्हाला भविष्यातील तिकिट बुकिंगसाठी 1 हजार रुपयांचे कूपन देखील देण्यात येईल. तसेच तुम्हाला जेवण, स्पाइसमेक्स, सीट बुकिंगवर भरघोस सूट दिली जाणार आहे.

या ऑफरमध्ये आपण 29 जानेवारीपर्यंत म्हणजेच केवळ आजच तिकिट बुक करू शकता. तसेच, या तिकिटावर आपल्याला 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रवास करावाच लागेल. या तिकिटावर केवळ एकच ऑफरचा लाभ घेता येणे शक्य आहे. या ऑफरसह इतर ऑफर जोडल्या जाऊ शकत नाहीत. तसेच ही ऑफर ग्रुप बुकिंगसाठीदेखील उपलब्ध नाही. या ऑफरचा फायदा लोकांना पहिल्यांदा आणि पहिल्या सेवा दिलेल्या आधारावर दिला जाईल. फ्लाईट वेळापत्रक बदलले देखील जाऊ शकते, जे आपल्याला आधीच सूचित केले जाईल. याद्वारे आपण केवळ डोमेस्टिक ठिकाणाचे अर्थात केवळ भारतातील ठिकाणाचे तिकिट बुक करू शकता.

या सेलमध्ये तिकीट बुक केलेल्या प्रत्येक प्रवाशाला प्रवासाच्या आधारे मोफत व्हाऊचर दिले जाईल. हे केवळ त्या व्यक्तीसच वैध असेल, ज्याने पूर्वी प्रवास केला असेल. हे व्हाऊचर आपल्याला तिकिटिंगच्या 48 ते 72 तासांच्या आत ईमेलद्वारे पाठवले जाईल. जर कोणी हे तिकीट रद्द केले, तर हे व्हाऊचर देखील स्वतःच अवैध होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.    

 

 

Leave a Comment