हा आहे Airtel चा 60 दिवसांचा बेस्ट प्रीपेड प्लॅन!! अमर्यादित कॉलिंगसह मिळतील OTT फायदे

0
3
Airtel
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये असलेल्या Airtel ने आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रीपेड प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये कंपनीने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या, ज्यामुळे अनेक युजर्सना आपल्या खर्चाचा पुन्हा विचार करावा लागला. मात्र आता Airtel ने ग्राहकांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या वैधतेसह अनेक नवीन प्लॅन बाजारात आणले आहेत.

जर तुम्ही 60 दिवसांच्या वैधतेसह एक मजबूत प्रीपेड प्लॅन शोधत असाल तर Airtel कडे एक उत्तम पर्याय आहे. कंपनीच्या 619 च्या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि एसएमएससह मनोरंजनाच्या सुविधाही मिळतात. हा प्लॅन जरी नवीन नसला तरी अनेक युजर्सना त्याच्या फायद्यांविषयी संपूर्ण माहिती नसल्यामुळे तो चर्चेत राहिला नाही. आज आपण याच प्लॅनविषयी जाणून घेणार आहोत.

619 Airtel प्रीपेड प्लॅनचे फायदे

60 दिवसांची वैधता: हा प्लॅन तब्बल दोन महिन्यांसाठी सक्रिय राहतो.

दररोज 1.5GB डेटा: इंटरनेट ब्राउझिंग, सोशल मीडिया, स्ट्रीमिंग आणि इतर कामांसाठी पुरेसा डेटा उपलब्ध.

अमर्यादित कॉलिंग: कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ.

100 एसएमएस प्रतिदिन: दररोज 100 फ्री मेसेजेस पाठवण्याची सुविधा.

OTT फायदे: या प्लॅनसोबत Airtel Xstream Play अ‍ॅक्सेस मिळतो, ज्यामध्ये SonyLIV आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंट पाहता येतो.

5G डेटा मिळेल का?

जर तुम्ही 5G अमर्यादित डेटाच्या शोधात असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही. कारण 619 च्या प्लॅनमध्ये 5G अनलिमिटेड डेटा बंडलचा समावेश नाही. मात्र, नियमित डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

इतर कोणते पर्याय आहेत?

जर तुम्हाला जास्त डेटा हवा असेल तर Airtel चे इतर प्रीपेड प्लॅन निवडता येतील. मात्र, 60 दिवसांची वैधता असलेला हा एकमेव प्लॅन आहे, त्यामुळे अधिक काळासाठी सतत रिचार्ज न करता तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. खास म्हणजे, तुम्ही मनोरंजनाच्या जगात रमू इच्छित असाल तर Airtel Xstream Play सह उपलब्ध असलेला हा प्लॅन तुम्हाला उत्तम अनुभव देईल. पण तुम्ही लांब वैधतेचा आणि भरपूर फायद्यांचा प्रीपेड प्लॅन शोधत असाल, तर 619 चा हा प्लॅन तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो.