Airtel Recharge Plan: Airtel युजर्सना धक्का !! आता प्रीपेड बेनिफिट्समध्ये होणार मोठे बदल

0
1
Airtel Recharge Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Airtel Recharge Plan- देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीपैकी एक म्हणून Airtel ला ओळखले जाते. सुनील भारती मित्तल यांच्या मालकीच्या Airtel ने नुकतेच त्यांच्या प्रीपेड प्लॅन्समध्ये काही बदल केले आहेत. याबाबतच टेलिकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने नवीन निर्देश जारी केले आहेत. ज्यांच्या अंतर्गत नेटवर्क ऑपरेटर्सना वॉइस आणि SMS सेवांसाठी विशेष टॅरिफ वाउचर्स (STVs) ऑफर करण्याची आवश्यकता आहे. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

509 चा प्रीपेड प्लॅन –

509 रुपयाचा नवीन प्लॅनमध्ये (Airtel Recharge Plan) 84 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. ज्यांना मोबाइल डेटा आवश्यक नाही पण अनलिमिटेड वॉइस कॉल्स पाहिजे, त्यांच्यासाठी हा प्लॅन चांगला आहे. तसेच या रिचार्जमध्ये तुम्हाला 900 फ्री SMS मिळतात. यासोबतच एयरटेलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये Airtel Xstream अँप , Apollo 24/7 Circle मेंबरशिप आणि फ्री हेल्लो ट्यूनसची सुविधा देखील मिळते. पण याआधी 509 रुपयेच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 6GB मोबाइल डेटा मिळत होता, म्हणजेच या प्लॅनमध्ये आता कमी बेनिफिट्स उपलब्ध आहेत.

569 चा प्लॅन (Airtel Recharge Plan) –

जर तुम्हाला असा प्रीपेड प्लॅन पाहिजे ज्यात अनलिमिटेड वॉइस कॉल्स, मर्यादित फ्री SMS आणि मोबाइल डेटा तर 569 रुपयेचा प्लॅन योग्य ठरू शकतो. या प्लॅनमध्ये देखील 84 दिवसांची व्हॅलिडिटी भेटेल आणि वॉइस व SMS बेनिफिट्ससोबत 6GB मोबाइल डेटा ऑफर केला जातो.

1,999 चा प्रीपेड प्लॅन –

Airtel ने 1999 च्या प्रीपेड प्लॅनमध्येही (Airtel Recharge Plan) बदल केले आहेत. आधी या प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉल्स, 3000 फ्री SMS आणि 24GB मोबाइल डेटा मिळत होता. परंतु आता एयरटेलने या प्लॅनमधून मोबाइल डेटा बेनिफिट्स पूर्णपणे काढून टाकले आहेत. तसेच या रिचार्जमध्ये Airtel Xstream अँप्सचे फ्री ऍक्सेस, Apollo 24/7 Circle मेंबरशिप आणि फ्री हेल्लो ट्यूनसचा ऍक्सेस मिळतो.

TRAI चा निर्देश जारी –

एयरटेलच्या या दोन्ही रिचार्ज प्लॅन्ससोबत स्पॅम फाइटिंग नेटवर्क सोल्यूशनची सुविधा मिळते. फ्री SMS लिमिट संपल्यानंतर लोकल व STD SMS साठी 1 रुपये आणि 1.5 रुपये प्रति SMS चार्ज घेतला जाईल. गेल्या डिसेंबरमध्ये टेलिकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने एक निर्देश जारी केला होता की देशातील नेटवर्क ऑपरेटरांना यूझर्सना एक विशेष टॅरिफ वाउचर (STV) ऑफर करावा लागेल, ज्यामुळे त्यांना त्यांच्या आवश्यक सेवांसाठी शुल्क भरता येईल. एयरटेलच्या नवीन STV प्लॅन्समध्ये जुन्या प्लॅन्सच्या तुलनेत कमी बेनिफिट्स आहेत, जे थोड्या प्रमाणात मोबाइल डेटा ऑफर करत होते.

हे पण वाचा : नव्या अवतारात लाँच झाली Honda Activa; पहा फीचर्स अन किंमत

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज