Airtel vs Jio | जुलै महिन्याच्या सुरुवातीला देशातील लोकप्रिय टेलिकॉम कंपन्या एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडिया त्यांनी देखील त्यांच्या रिचार्ज प्लॅन महाग केले आहे. त्यानंतर त्यांच्या युजर्स मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. रिचार्जची रक्कम जास्त झाल्याने आता अनेक लोक हे बीएसएनएलकडे वळताना दिसत आहे. परंतु लोकांनी तसे करू नये. यासाठी आज डेटा प्लॅन (Airtel vs Jio) बद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
एअरटेल डेटा प्लॅन | Airtel vs Jio
एअरटेलचे ग्राहक खूप होते. परंतु एअरटेलने त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने अनेक युजरस आता बीएसएनएलकडे वळलेले आहेत. परंतु आता एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना टिकून ठेवण्यासाठी आणि नवीन ग्राहक आकर्षित करण्यासाठी एक नवीन डेटा प्लॅन लॉन्च केलेला आहे. त्यांनी सगळ्यात स्वस्त 11 रुपयांचा प्लॅन आणलेला आहे. यामध्ये तुम्ही केवळ एक तासासाठी अनलिमिटेड डेटा वापरू शकता.
त्याचप्रमाणे 33 रुपयांमध्ये तुम्हाला 2 जीबी डेटा दिला जातो त्याचा वैधता एक दिवसाची असते. त्याचप्रमाणे 49 रुपयांचा देखील एक प्लॅन आहे. ज्यामध्ये तुम्ही एक दिवसासाठी अनलिमिटेड डेटा वापरू शकतो. तसेच 99 रुपयांचा देखील एक डेटा प्लॅन आहे. या डेटा प्लॅनची वैधता दोन दिवसांसाठी आहे. यात तुम्ही अनलिमिटेड देता वापरू शकता. त्यामुळे ज्या लोकांना जास्त डेटा लागतो. त्यांच्यासाठी हे प्लॅन अत्यंत चांगले आहेत.
जिओचे डेटा प्लॅन
एअरटेल प्रमाणे जिओने देखील त्यांचे अनेक डेटा प्लॅन लॉन्च केलेले आहेत. सगळ्यात स्वस्त 49 रुपयांचा डेटा प्लॅन लॉन्च केलेला आहे. या प्लॅनची वैधता एक दिवसाची आहे. तुम्ही एखाद्या दिवसासाठी अनलिमिटेड डेटा वापरू शकता. यामध्ये तुम्हाला 25 जीबी डेटा मिळतो. दुसरा प्लॅन 175 रुपयांचा आहे. हा प्लॅन 28 दिवसांचा आहे. यामध्ये तुम्हाला 10 जीबी नेट वापरता येते.
त्याचप्रमाणे सोनी लिव, झी फाईव्ह, जिओ सिनेमा प्रीमियम आणि इत्यादींच्या सबस्क्रिप्शन देखील मिळते. त्याचप्रमाणे 289 रुपयांचा आणखी एक प्लॅन लॉन्च केलेला आहे. या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला 40 जीबी डेटा मिळतो. त्याचप्रमाणे 359 रुपयांचा देखील एक प्लॅन आहे. ज्या प्लॅनची वैधता 30 दिवसाच्या आहे. यामध्ये तुम्हाला तब्बल 50 जीबीचा डेटा मिळतो. तुम्हाला जर जास्त डेटाची गरज असेल, तर जीओ आणि एअरटेलचे हे प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर असे प्लॅन आहेत.