Jio की Airtel ?? कोण देतंय स्वस्त रिचार्ज

Airtel vs Jio Recharge
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यामध्ये प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या प्लॅनमध्ये मोठी वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे. यासाठीच ग्राहकांनी योग्य प्लॅन निवडणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. भारतातील प्रमुख दोन टेलिकॉम कंपन्या रिलायन्स Jio आणि Airtel , पोस्टपेड सेवेच्या बाबतीत आकर्षक योजना देत आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला कोणता प्लॅन सोयीस्कर ठरणार आहे , हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत . तर चला जाणून घेऊयात या दोन्ही आकर्षक प्लॅन बदल अधिक माहिती .

Airtel चा पोस्टपेड प्लॅन –

Airtel या प्रमुख टेलिकॉम कंपनीने त्यांचा 449 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आणला आहे. यामध्ये ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 50GB डेटा उपलब्ध होणार आहे. यासोबतच त्यांना अनलिमिटेड कॉल करता येणार आहेत. तसेच दरमहा 100 मोफत एसएमएस करता येतील . ग्राहकांना जास्त फायदे मिळावेत यासाठी Airtel Xstream Play Premium चे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये जास्त डेटा मिळतो आणि एक्सट्रीम प्लेचा अ‍ॅक्सेस ग्राहकांसाठी फायदेशीर ठरतो.

Jio चा पोस्टपेड प्लॅन –

Jio च्या पोस्टपेड प्लॅन तुमच्यासाठी 349 रुपयांना उपलब्ध होणार आहे. या आकर्षक प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. तसेच दर महिन्यासाठी 100 मोफत एसएमएस करता येणार आहेत. जिओच्या 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 30GB प्रति महिना डेटाची सुविधा मिळणार आहे. या कंपनीने ग्राहकांसाठी Jio TV, Jio Cinema, आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन दिले आहे. त्यामुळे ग्राहकवर्ग याकडे जास्त आकर्षित होतायत . जिओचा प्लॅन कमी किंमतीत उपलब्ध असून, डिजिटल सबस्क्रिप्शनसाठी अधिक पर्याय उपलब्ध करून देतो.

योग्य प्लॅनची निवड –

जर तुम्हाला जास्त डेटा हवा असेल, तर Airtel चा 449 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी योग्य ठरेल . तुम्हाला जर कमी बजेटमध्ये जास्त फायदे हवे असतील तर Jio चा 349 चा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो. Jio आपल्या ऍप्सच्या सबस्क्रिप्शनसह अधिक मनोरंजन पर्याय देते, तर एअरटेल OTT अ‍ॅक्सेसवर भर देते. ग्राहकांनी आपली डेटा वापराची गरज, बजेट, आणि अतिरिक्त सुविधांचा विचार करून योग्य पोस्टपेड प्लॅन निवडून , विविध सुविधांचा फायदा करून घ्यावा .