अजिंक्य रहाणे चेन्नईकडून सलामीला खेळणार ?? ; जाणून घ्या कसं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये आत्तापर्यंत चेन्नई सुपर किंग्स ची कामगिरी म्हणावी तशी समाधानकारक राहिली नाही.तीन वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नईला अजूनही सलामीच्या जोडी डोकेदुखी ठरत आहे. भरवशाचा मुरली विजय सलग अपयशी ठरला.परंतु अशातच चेन्नईसाठी एक मोठी संधी देखील चालून आली आहे. त्यांनी जर ही संधी साधली तर भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे चेन्नई कडून सलामीला खेळू शकतो….तुम्हाला आश्चर्य वाटत असेल तर हो हे शक्य आहे.

आयपीएलच्या नव्या नियमानुसार, IPL 2020 मध्यंतरानंतर Mid Season Transferला सुरुवात होईल आणि त्यानुसार संघ त्यांना हवा त्या खेळाडूंची देवाण-घेवाण करू शकतील. पण त्या खेळाडूंनी फक्त दोन-तीनच सामने खेळले असावे असा नियम आहे. त्यामुळे CSK सलामीसाठी पर्याय म्हणून अजिंक्यचा विचार करू शकतील.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात घेतले. त्यामुळे शिखर धवन सोबत तो दिल्लीच्या डावाची सुरुवात करेल, असा अंदाज लावला गेला. पण, चार सामन्यानंतरही रहाणेला अंतिम अकरामध्ये स्थान मिळालेलं नाही. दिल्लीनं तीन विजयासह सध्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. पृथ्वी शॉ, शिखर धवन, कर्णधार श्रेयस अय्यर, मार्कस स्टॉयनिस, रिषभ पंत चांगल्या फॉर्मात आहेत. अशात दिल्ली त्यांचा विजयी संघ बदलण्याची शक्यता फार कमी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like