सातारा जिल्ह्यातील जवान अजिंक्य राऊत यांना वीरमरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खटाव | येथील सैन्य दलातील जवान अजिंक्य किसन राऊत यांना सिकंदराबाद येथे कर्तव्य बजावताना वीरमरण आले. सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची बातमी कळताच सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली. अचानक प्रकृती खालावल्याने मृत्यू झाला आहे.

अजिंक्य राऊत 2018 साली भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. सध्या सिकंदराबाद येथील आर्मी मेडिकल कोअर येथे कार्यरत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांना वीरमरण आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

https://www.facebook.com/297806127025237/posts/2152103754928789/

 

अजिंक्य राऊत यांचे शिक्षण खटाव येथील लक्ष्मीनारायण इंग्लिश स्कूल येथे झाले असून, उच्च माध्यमिक शिक्षण येथील शहाजीराजे महाविद्यालयात झाले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.

Leave a Comment