अजित पवारांनी दिला राजकारण सोडून लेखक होण्याचा फडणवीसांना सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे आज प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी करत फडणवीस यांना टोले लगावले.

‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे देवेंद्र फडणवीस यांचं पुस्तक पाहिलं तर फडणवीस हे उत्तम साहित्यिक होऊ शकतात असं मला जाणवायला लागलं आहे. असं म्हणतं अजित पवारांनी फडणवीस यांना ‘तुम्ही राजकारण सोडून लेखक व्हायला काही हरकत नाही’ असा सल्ला अजित पवार यांनी देताच सर्वांनी त्याला दाद दिली.

अजित पवार यांनी कौतुक करतम्हणाले, ”फडणवीस यांनी लिहिलेलं पुस्तक अत्यंत चांगलं आहे. त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत अर्थसंकल्प समजावून सांगण्याचं काम केलं आहे. हे पुस्तक वाचून ते उत्तम साहित्यिक होऊ शकतात याची खात्री पटली असं त्यांनी सांगितलं.

पवार ते म्हणाले,” भाजपचे जेष्ठ नेते राम नाईक तुम्हीही या कार्यक्रमाला हजर आहात. तुम्ही जरा वर दिल्लीला सांगितलं की फडणवीस हे साहित्यिक आहेत, यांना बरंच ज्ञान आहे तर फडणवीसांच्या ज्ञानाचा आपण दिल्लीत वापर करून घेऊ शकता. असं झाल्यास महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहाची त्याला एकमताने मान्यता राहीलच पण या गोष्टीचा सर्वाधिक आनंद सुधीर मुनगंटीवार यांनाच होईल. गळ्याची आण खोटं बोलतं नाही, असा चिमटा अजित पवार यांनी काढताच सभागृहात एकच हशा पिकाला.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment