अजित पवार तुम्हाला आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतोय का? : गोपीचंद पडळकरांचा पत्राद्वारे सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंढरपूर येथील पोट निवडणुकीत विजय प्राप्त केलेले भाजचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून महाविकार आघाडी सरकारवर वारंवार टीकास्त्र डागले जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पडळकरांनी पत्र लिहले असून त्यातून सरकारी नोकरीमध्ये असलेल्या पदोन्नतीमध्ये आरक्षण रद्द झाल्याच्या कारणांवरून निशाणा साधला आहे.  “दादा ! बहुजनांचे हक्क आणि अधिकार हे तुम्हाला बारामतीची जहागिर वाटतात का? आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतोय का? कदाचित तुम्हाला काही खास अधिकाऱ्यांचीच सोय लावून वसूली  वाढवायची आहे का? असा सवाल पडळकरांनी विचारीत पदोन्नती बाबतचे तीन्ही अद्यादेश त्वरीत रद्द करा, अन्यथा मी २५मे पासून मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशाराही दिला आहे. 

पंढरपूर येथील पोट निवडणुकीनंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला जातोय. पडळकरांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रही लिहले आहे. या पत्रात ते म्हणाले आहेत कि, “ज्या राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण देण्याचे काम केले. त्यांच्या विचारांना काळीमा फासण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. आरक्षण येथील शोषित आणि मागासलेल्या समाजासाठी न्यायाचा आधार आहे. बहुजनांच्या हिताच्या बाबतीत आपले सरकार सतत गळचेपीचे धोरण राबवत आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचं नाव घेण्याचा कोणताच नैतिक अधिकार महाविकास आघाडीला आता राहिलेला नाही.

प्रथम २०२१ मध्ये अन्यायकारक अद्यादेश काढून राज्यात मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा कोणताही विचार न करता २००४ च्या सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती भरण्याचे निर्देश दिले होते. हा निर्णय बहुजनांवर अन्याय कारक होता. त्याला विरोध झाला. तरीही २०२१ रोजी नवा अद्यादेश काढला. आता आपण पुन्हा ७ मे २०२१ रोजी गोंधळात टाकणारा नवीन अद्यादेश काढला आहे. यातही बहुजनांना भविष्यात आरक्षण कसे मिळणार नाही, याचीच रितसर सोय करून ठेवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्हाला आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतोय का? की बारामतीची जहागिरी?

Leave a Comment