धनंजय मुंडेंना नेमकं काय झालं?? अजितदादा म्हणतात, अटॅक नव्हे तर..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का आल्याने मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज धनंजय मुंडे यांची भेट घेऊन चौकशीची विचारपूस केली.

यावेळी अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या तब्बेतीबाबत माहिती देताना हृदयविकाराच्या धक्क्याचे खंडन केले, धनंजय मुंडे यांना सौम्य धक्का वगैरे बसला नसून त्यांना भोवळ आल्याने त्यांची शुद्ध हरपली होती. मात्र आता धनंजय मुंडे यांची तब्बेत स्थिर आहे. डॉक्टर दुपारी त्यांना वार्डमध्ये शिफ्ट करतील, त्यांना विश्रांती घ्यायला सांगितलं आहे. त्यांचा एमआयआर करण्याचं काम सुरू आहे. घाबरण्याचं कारण नाही असं अजित पवार म्हणाले.

धनंजय मुंडे यांना काल रात्री अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आक्रमक आणि धडाडीचा चेहरा म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत.

Leave a Comment