Ladaki bahin yojana: लाडक्या बहिण योजनेचे पैसे कधी मिळणार? अजित पवारांनीच सांगितली अचूक वेळ

0
4
ladaki bahin yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ladaki bahin yojana| सध्या राज्यामध्ये लाडकी बहिण योजना (Ladaki Bahin Yojana) ही लवकरच बंद पडेल अशी चर्चा सुरू आहे. विरोधक या मुद्द्याला धरूनच सरकारवर जोरदार टीका करत आहेत. यावरूनच आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सडेतोड भाष्य केले आहे. तसेच, “महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लाडकी बहिण योजनवरुन आमच्यावर टीका केली जात आहे. ही योजना बंद होणार असे सांगतिल जात आहे. पण येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

आज जालना जिल्ह्यातील परतूरधील माजी आमदार सुरेश जेथलीया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार याच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेससंदर्भात भाष्य केले. अजित पवार म्हणाले की, कालच मी 3 हजार 500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे. येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना (Ladaki bahin yojana) पैसे मिळणार आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, _एक रुपयात पिक विमा दिला मात्र त्याचे गैरप्रकार किती केले. गायरान जमीन शासकीय जमीन यावर पिक विमा काढण्यात आला आहे. कुठे फेडला हे पाप? योजनेचा योग्य फायदा घेतला पाहिजे” त्याचबरोबर, “आम्ही बेरजेचे राजकारण करतोय. हा शिव शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तीच परंपरा आपल्याला टिकवायची आहे. जातीय सलोखा टिकला पाहिजे यासाठी आपण काम केले पाहिजे” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, “आम्ही यापुढे स्थानिक पदाधिकाऱ्यांना अधिकार देणार आहोत. जो सामाजिक बांधिलकी जपून काम करतोय अशा होतकरु तरुणांना जिल्हा परिषद नगर परिषदेत संधी द्या असे अजित पवार म्हणाले. महायुती मध्ये समन्वयक नेमले आहेत. आम्ही सर्वांना सांगितले आहे महामंडळ कुणाला कोणते हवेत ते घ्या अन सर्वांना संधी द्या. आपला महाराष्ट्र साधू संतांची भूमी आहे” असे वक्तव्य अजित पवार यांनी केली आहे.