सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या: पार्थ पवारांनी केली गृहमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला जवळपास ४० दिवसांचा काळ लोटला आहे. तरी देखील त्यांच्या आत्महत्ये मागील ठोस कारण समोर आले नाही. त्याच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत ३७ पेक्षा जास्त जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. एवढचं नाही तर सुशांतची आत्महत्यानसून हत्या आहे, असं वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले जात आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येबाबत चौकशी सोपवण्यात यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी विनंती पत्राद्वारे केली. सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी योग्य चौकशी व्हावी अशी भावना संपूर्ण देश आणि विशेषत: तरुणांची आहे. त्यामुळे याप्रकरणी सीबीआय चौकशी सुरू करण्यात यावी. ‘असं ट्विट पार्थ पवार यांनी केलं आहे. दरम्यान, सुशांतने आत्महत्या का केली असावी. त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली.. हे रहस्य आता लवकरच उलगडणार असं चित्र समोर येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment