“काही जण स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी द्वेष निर्माण करत आहे”; जलिलांच्या पवारांवरील टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांच्यावर आज टीका केली आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलील यांच्यावर निशाणा साधला आहे. “मुळात काही जण स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी काही राजकीय पक्ष, समाजमध्ये द्वेष निर्माण करत आहे,” असे प्रत्युत्तर देत पवार यांनी जलील यांच्यावर टीका केली.

मुंबईमध्ये नुकताच राष्ट्रवादीच्या कार्यालयात अभिनेत्री आसावरी जोशी यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेश कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,  “इम्तियाज जलील यांनी शरद पवार यांना अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर तुमच्या विश्वास नाही का? असा सवाल केला आहे.

याबाबत आमचंही शरद पवार यांच्याशी बोलणं झालं आहे. जे महत्त्वाचे विषय होते, त्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाल्याचं सांगितलं. पण मी स्वत: पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे, असं त्यांनी सांगितलं. तरीही जाणीवपूर्वक काही जण जाणीवपूर्वक समाजात विपर्यास निर्माण करण्याचे काम करत आहे, असे प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिले.