औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबादेत होणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसी यांच्या सभेवर बंदी घाला. अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी केली आहे. येत्या आठवड्यात एआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांची औरंगाबादेत सभा होणार आहे. मात्र, अकबरुद्दीन यांना औरंगाबादमध्ये सभा घेण्यास बंदी घालावी अशी मागणी भाजपकडून केली जात आहे.
एकीकडे दिल्लीमध्ये हिंसाचार सुरू असताना आपल्या विवादित वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ओवेसी यांची सभा होणार आहे. ते सांप्रदायिक वक्तव्य करून औरंगाबाद शहराच्या शांततेला धोका निर्माण करू शकतात. यामुळे ओवीसी बंधूंना औरंगाबादेत पाय ठेऊ देऊ नये. अशी विनंती भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेऊन केली आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.