अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे आक्रोश आंदोलन ठरले लक्षणीय

औरंगाबाद : येथील जालना रोडच्या आकाशवाणी चौक येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासह वेगवेगळ्या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यात यावी, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण पूर्ववत झाले पाहिजे, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी तसेच २०११ मध्ये केंद्र सरकारने केलेल्या जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात यावी या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फ जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ घोडके यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आक्रोश आंदोलन करण्यात आले.

यावेळी त्यांनी उपस्थितांना बोलतांना सांगितले की, केंद्र सरकारने २०११ मध्ये केलेल्या जनगणनेची खरी आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही आणि जोपर्यंत खरी आकडेवारी न्यायालयात सादर करण्यात येत नाही तोपर्यंत आपल्याला आपले हक्काचे आरक्षण मिळणार नाही आणि केंद्र सरकार हे जाणीवपूर्वक करीत आहे.

या आक्रोश आंदोलनामध्ये आजी माजी लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. तसेच
महानगराध्यक्ष गजानन सोनवणे,अमोल तुपे, चंद्रकांत पेहरकर, गणेश काळे आदींनी विविध पेहराव करून लक्ष वेधून घेतले होते. तर सुरेश बनसोड, जयराम साळुंके, निशांत पवार, एल. एम. पवार, वामन भागवत, साईनाथ करवंदे, प्रकाश शिरसे, योगेश हेकाडे, संदीप घोडके,अर्जुन गाडेकर, राजेंद्र दारुंटे,सचिन गोरे, देविदास सोनवणे, अमोल कुदळ, विनायक पाराशर, प्रशांत वाणी, ज्ञानेश्वर जेजुरकर, सावता परिषदेचे बाबासाहेब जाधव, अशोक गोरे, शिवानंद झोरे, महिला आघाडीच्या पार्वतीताई शिरसाठ, माजी नगरसेविका कीर्ती शिंदे,अनिता देवतकर, सुभद्रा जाधव, द्वारका पवार, सरोज नवपुते, रोहिणी काळे, विलास गाडेकर, साळूबा पांडव, संजय फटाकडे, गणेश अंबेकर, सीमा नाईक, आबासाहेब शिरसाठ, नारायण फाळके, संजय कुदळे आदींची उपस्थिती होती.

You might also like