Akhil Bharatiya Marathi Natya Parishad : मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर; अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडींना करणार सन्मानित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा नुकताच जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आनंदाची बातमी अशी की. मराठी कलाविश्वात दिग्गज कलाकारांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ अर्थात सर्वांचे लाडके मामा आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी याना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. या घोषणेनंतर एकूणच नाट्य रसिकांमध्ये या पुरस्कार सोहळ्याबाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

कधी आणि कुठे पार पडणार पुरस्कार सोहळा? (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad)

माहितीनुसार, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या १४ जून २०२४ रोजी हा पुरस्कार सोहळा मुंबईत, माटुंगा येथील यशवंत नाट्य संकुलात पार पडणार आहे. यावेळी नाट्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रंगकर्मीचा नाट्य परिषदेच्या वतीने सत्कार केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कलावंतांचा मेळावा आयोजित केला गेला आहे. यामध्ये हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

या सोहळ्यात आणखी कोणते पुरस्कार दिले जाणार?

माहितीनुसार, या सोहळ्यात अन्य काही महत्वाचे पुरस्कार देखील प्रदान केले जाणार आहेत. (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad) ते खालीलप्रमाणे: –

1. लीला मेहता पुरस्कृत भार्गवराम पांगे कार्यकर्ता पुरस्कार – गणेश तळेकर (नाट्य चळवळीसाठी विनामूल्य कार्य)

2. डॉ. न. अ. बरवे स्मृती पुरस्कार – प्रशांत जोशी

3. कमलाकर वैशंपायन स्मृती पुरस्कार – दीपाली घोंगे

4. कै. भालचंद्र त्र्यंबक जोशी स्मृती पुरस्कार – शशांक लिमये (उत्कृष्ट निवेदक) (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad)

5. बाळकृष्ण भोसले स्मृती पुरस्कार – विजय जगपात (गुणी रंगमंच कामगार)

6. वि.स. खांडेकर नाट्यसमीक्षा पुरस्कार – संजय देवधर (समीक्षा)

7. अ. सी. केळुस्कर स्मृती पुरस्कार – गोविंद गोडबोले (बालरंगभूमीवरील योगदान)

8. सर्वोत्कृष्ट नाट्य व्यवस्थापक – प्रणीत बोडके

9. नाट्य मंदार पुरस्कार – अशोक ढेरे

10. उत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार – अशोक बेंडखळे (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad)

11. कामगार रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार – श्याम आस्करकर

12. विशेष पुरस्कार – रितेश सांळुके (कार्यकर्ता पुरस्कार)

13. कै. विनय आपटे, कै. अविनाश फणसेकर आणि कै. भाई बोरकर स्मृती पुरस्कार – प्रायोगिक नाट्यसंस्था : अभिनय संस्था (कल्याण) – अभिजीत झुंझारराव (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad)