पराभवानंतर अखिलेश यादव यांच्या ‘ट्विट’ ची जोरदार चर्चा; म्हणाले की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 270 हुन अधिक जागेंवर विजय मिळवला. तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या समाजवादी पक्षाला 130 च्या आसपास जागा मिळाल्या. दरम्यान, या पराभवानंतर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी 1 ट्विट करत कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा ऊर्जा निर्माण केली आहे.

अखिलेश यादव ट्विट करत म्हणाले, आमच्या जागा अडीच पट आणि मतदानाची टक्केवारी दीड पट वाढवल्याबद्दल उत्तर प्रदेशातील जनतेचे मनःपूर्वक आभार! भाजपच्या जागा कमी होऊ शकतात, हे आम्ही दाखवून दिले आहे. भाजपची ही घसरण सातत्याने सुरू राहणार. अर्ध्याहून अधिक संभ्रम आणि भ्रम दूर झाला, उर्वरित काही दिवसांत होईल. जनहिताचा लढा जिंकेल!

 

दरम्यान, उत्तरप्रदेशात भाजप आणि समाजवादी पक्षात जोरदार लढाई पाहायला मिळली. अखिलेश यादव यांनी भाजपला कडवे आव्हान दिले होते. मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या झंझावाती प्रचाराचा भाजपला थेट फायदा झाला. भाजपला पुन्हा एकहाती सत्ता मिळाली असून तब्बल २७० हुन अधिक जागा मिळाल्या आहेत. तर समाजवादी पार्टीला १३०, बसपा ला १, काँग्रेसला २ जागांवर समाधान मानावे लागले.

Leave a Comment